शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
5
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
6
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
7
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
8
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
9
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
10
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
11
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
12
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
13
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
14
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
15
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
16
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
17
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
18
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
19
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
20
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा

अजब तर्कट ! जीन्स-मोबाइलच्या वापरामुळे मुली भरकटतात व मुलांसोबत पळून जातात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2018 10:47 IST

इथली ग्रामपंचायत म्हणे मुली जीन्स व मोबाइल वापरतात आणि....

ठळक मुद्देजीन्स-मोबाइल वापरामुळे मुली भरकटतातजीन्स-मोबाइल वापरुन मुली मुलांसोबत पळून जातातमुलींनी जीन्स-मोबाइलचा वापर करायचा नाही, तालिबानी फतवा

सोनीपत - प्रत्येक क्षेत्रात आज महिलावर्ग महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत आहेत. उत्तुंग असे शिखर गाठत आहेत. मात्र हरियाणातील सोनीपत येथे महिलांनी समाजात कसे वावरावे, याबाबतचे समज अद्यापही बदललेले नाहीत. सोनीपतमधील एका गावामध्ये तरुणींच्या जीन्स व मोबाइल वापराला विरोध दर्शवण्यात येत आहे. जीन्स व मोबाइलच्या वापरामुळे मुली भरकटतात आणि मुलांसोबत पळून जातात, असे येथील लोकांचं म्हणणे आहे. मुलींच्या जीन्स-मोबाइल वापराविरोधात पंचायतीनं तालिबानी फतवा काढला आहे.

संपूर्ण गाव या निष्कर्षाचे समर्थन करत असल्याची माहिती गावच्या सरपंचानं दिली आहे. गावातील मुलींनी जीन्स व मोबाइलचा वापर करायचा नाही, असा तालिबानी फतवा गोहानाच्या जवळील गाव ईशापूर खेडीतील पंचायत समितीनं काढला आहे. हा फतवा काढण्यामागील पार्श्वभूमीदेखील अजबच आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तीन प्रकरणांत मुलींनी प्रियकरासोबत पळून जाऊन लग्न केले आणि तिन्ही मुली जीन्स व मोबाइलचा वापर करायच्या, असा हास्यास्पद तर्क पंचायत समितीनं लावला आहे. 

'मुलींच्या पळून जाण्याला मोबाइल जबाबदार'सरपंच प्रेम सिंह यांचे म्हणणे आहे की, ईशापूर खेडी येथे गेल्या दोन-तीन घटनांमध्ये मुली आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्या. मुलींच्या पळून जाण्यानं पंचायतीची बदनामी झाली आणि यामुळे पंचायतच्या बैठकीत या घटनेला मोबाइलला जबाबदार ठरवण्यात आले आहे. दरम्यान, अशा प्रकारचे अनेक तुघलकी फतवे हरियाणातील ग्रामीण क्षेत्रांमध्ये काढले जातात.   

टॅग्स :MobileमोबाइलWomenमहिला