हरियाणात सर्वाधिक ७६ टक्के मतदान

By Admin | Updated: October 16, 2014 04:52 IST2014-10-16T04:52:34+5:302014-10-16T04:52:34+5:30

हरियाणात आजवरच्या सर्वाधिक ७६ टक्के मतदानाची नोंद झाली. १९६७ मध्ये ७२.६५ टक्के मतदानाची नोंद झाली होती

Haryana tops with 76 percent polling | हरियाणात सर्वाधिक ७६ टक्के मतदान

हरियाणात सर्वाधिक ७६ टक्के मतदान

चंदीगड : हरियाणात आजवरच्या सर्वाधिक ७६ टक्के मतदानाची नोंद झाली. १९६७ मध्ये ७२.६५ टक्के मतदानाची नोंद झाली होती. तो विक्रम यावेळी मोडित निघाला. हिंसाचाराच्या तुरळक घटनांमध्ये १० पोलिसांसह ३२ जण जखमी झाले. काँग्रेस, भाजप आणि आयएनएलडी या तीन प्रमुख पक्षांमध्येच लढती झाल्या.
हरियाणाच्या इतिहासात आजवरच्या सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे. एकदा संपूर्ण आकडेवारी मिळाल्यानंतर अंतिम टक्केवारीत किंचित बदल होऊ शकतो, असे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत वालगड यांनी सांगितले. सायं. ६ वाजता मतदान संपतानाही अनेक मतदान केंद्रांवर रांगा दिसत होत्या. फतेहाबाद, हिसार, जिंद, कुरुक्षेत्र, मेवात, रोहतक, सिर्सा, यमुनानगर, कैथाल येथे भरघोस मतदानाची नोंद झाली. फरिदाबाद, गुडगाव आणि पंचकुुला जिल्ह्णात सामान्य मतदान झाले. २००९ च्या निवडणुकीत ७२.३७ टक्के मतदान झाले होते; मात्र १९६७ चा ७२.६५ टक्के मतदानाचा विक्रम अबाधित होता. हिसार जिल्ह्णातील बारवाला येथे पोलिंग एजंट आणि दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या संघर्षात १० पोलीस जखमी झाले. जमावाने सात मोटारसायकली पेटवून दिल्या. मारहाणीत ३० जण जखमी झाले. पोलिंग एजंटमध्ये किरकोळ कारणावरून शाब्दिक चकमक झाल्यानंतर वाद विकोपाला गेला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले. सिर्सा येथे दोन जण जखमी झाले. किरकोळ वादानंतर एकाने गोळीबार केला. माजी मंत्री गोपाल कांडा हे या ठिकाणाहून पुन्हा निवडणूक लढत आहेत. त्यांच्या एका समर्थकाच्या कारच्या खिडकीची काच फुटल्यानंतर वादाला सुरुवात झाली होती.

Web Title: Haryana tops with 76 percent polling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.