शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Sandeep Singh Haryana Minister: "देश सोडलास तर 1 कोटी देईन", महिला प्रशिक्षकाचा मंत्री संदीप सिंग यांच्यावर आणखी एक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 14:20 IST

हरयाणाचे मंत्री संदीप सिंग यांच्या छळ आणि विनयभंग प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे.

नवी दिल्ली : हरयाणाचेमंत्री संदीप सिंग यांच्या छळ आणि विनयभंग प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे. याप्रकरणी चंदीगड पोलिसांच्या एसआयटीने महिला प्रशिक्षकाची तब्बल 8 तास चौकशी केली. एसआयटीसमोर हजर झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना महिला प्रशिक्षक म्हणाली की, "केस मागे घेण्यासाठी मला एक कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे."

माझ्यावर गप्प राहण्यासाठी दबाव आणला जात असल्याचे संबंधित महिला प्रशिक्षिकेने म्हटले. "मला देश सोडून दुसऱ्या देशात जाण्यास सांगणारे फोन येत आहेत. त्यासाठी एका महिन्यासाठी एक कोटी रुपये मिळतील. मला माझी तक्रार मागे घेण्यास सांगितले जात आहे, तर गप्प बस नाही तर कोणत्या दुसऱ्या देशात जा असे सांगितले जात आहे", असा आरोप महिला प्रशिक्षकाने केला आहे. याशिवाय मी आज सकाळी मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य ऐकले आणि ते स्वत: संदीप सिंग यांचा बचाव करत आहेत असेही संबंधित महिला प्रशिक्षकाने म्हटले. 

कलम 164 नोंदवले जाईल - वकीलमहिला प्रशिक्षकाचे वकील दिपांशू बन्सल यांनी म्हटले, "मागील आठ तासांपासून प्रश्नांची उत्तरे दिली जात आहेत. माझ्याकडे जे काही पुरावे होते ते आम्ही आधीच पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत. फोनही पोलिसांच्या हवाली करण्यात आला आहे. संदीप सिंग यांना अटक करण्यासाठी आम्ही पोलिसांना दोन ते तीन दिवसांचा कालावधी देऊ."

कागदपत्राच्या बहाण्याने फोन करून विनयभंग केल्याचा आरोपदरम्यान, महिला प्रशिक्षकाने केलेल्या तक्रारीत कलम 354, 354A, 354B, 342, 506 IPC पोलीस स्टेशन सेक्टर 26, चंदीगड अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास केला जात आहे. हरयाणाच्या क्रीडा विभागात नियुक्त केलेल्या महिला प्रशिक्षकाने पत्रकार परिषदेत आरोप केला होता की, राज्याचे क्रीडा मंत्री संदीप सिंग यांनी एका कागदपत्राच्या बहाण्याने आपल्याला आपल्या शासकीय निवासस्थानी बोलावून विनयभंग केला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :Haryanaहरयाणाsexual harassmentलैंगिक छळCrime Newsगुन्हेगारीministerमंत्री