शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

८ दिवसांत २२ वेळा लागली शेतकऱ्याच्या घराला आग, धक्कादायक प्रकारामुळे गावकरी भयग्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 16:24 IST

Haryana News: हरयाणातील सोनिपतमधील फरमाणा गावांमध्ये मागच्या काही दिवसांपासून घडत असलेल्या धक्कादायक प्रकारामुळे गावकरी भीतीच्या छायेत आहेत. येथील हरकिशन नावाच्या शेतकऱ्याच्या घरामध्ये आग लागण्याच्या घटना घडत आहेत.

हरयाणातील सोनिपतमधील फरमाणा गावांमध्ये मागच्या काही दिवसांपासून घडत असलेल्या धक्कादायक प्रकारामुळे गावकरी भीतीच्या छायेत आहेत. येथील हरकिशन नावाच्या शेतकऱ्याच्या घरामध्ये आग लागण्याच्या घटना घडत आहेत. घरात अधुनमधून लागत असलेली आग हा परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. तसेच आता पीडित कुटुंबासह ग्रामस्थही भीतीच्या छायेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार या शेतकऱ्याच्या घरातील दागिने ठेवलेल्या लॉकरला आठ दिवसांपूर्वी आग लागली होती. त्यानंतर मागच्या आठवडाभरात घरात तब्बल २२ वेळा आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. ही आग कशी लागतेय, हे जाणून घेण्यासाठी आणि खबरदारीचा उपाय म्हणून कुटुंबातील सदस्य आणि ग्रामस्थ सातत्याने पहारा देत आहेत. नेमका काय प्रकार घडतोय, हे पाहण्यासाठी आजूबाजूचे लोक हरिकिशन यांच्या घराजवळ गर्दी करत आहेत. आठ दिवसांपूर्वी जेव्हा या घरातील कपाटाला आग लागली होती, तेव्हा लॉकरमध्ये ठेवलेले चांदीचे दागिने वितळून गेले होते. तेव्हापासून घराच्या आत विविध ठिकाणी आग लागल्याच्या २२ घटना घडल्या आहेत. या आगीत घरातील कपडे, फर्निचर आणि इतर साहित्य जळालं आहे. मात्र ही आग कशी लागत आहे त्यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

या घटनेमुळे सदर शेतकरी कुटुंब भयभीत झालं आहे. त्यांनी सांगितलं की, आमच्याकडे आठ म्हैशी आहेत. त्यांचं दूध विकून आम्ही उदरनिर्वाह करतो. मात्र वारंवार आग लागत असल्याने घाबरलेले ग्रामस्थ आमच्या घरात दूध घ्यायलाही येत नाहीत. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामस्थांकडून या शेतकऱ्याच्या घराजवळ पहारा देत आहेत.

पीडित शेतकरी कुटुंबानं सांगितलं की, रात्री जेव्हा मुलं झोपतात, तेव्हा कुटुंबातील मोठे सदस्य हे जागरण करतात. कधी कुठे आग लागून नुकसान होईल हे सांगता येत नसल्याने, हे कुटुंब जीव मुठीत धरून राहत आहे. आता या प्रकाराची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू असून, काही जण ही घटना अंधश्रद्धा असल्याचे म्हणत आहेत. तर काही जण यामागे काही नैसर्गिक किंवा शास्त्रीय कारणं असल्याचाही दावा केला जात आहे. आता या आगीची फॉरेन्सिक पथकाला बोलावून तपासणी करावी, अशी मागी पीडित कुटुंबाने पोलिसांकडे केली आहे.  

टॅग्स :HaryanaहरयाणाHomeसुंदर गृहनियोजनfireआगSocial Viralसोशल व्हायरल