शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

गाडीसाठी 20, घरासाठी 60 लाख... हरयाणाच्या आमदारांना किती वेतन मिळते? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 14:32 IST

Haryana Assembly Election : हरयाणाच्या आमदारांना मिळणारे वेतन किती आणि त्यांना कोणत्या सुविधा मिळतात? त्याबद्दल जाणून घेऊया.

Haryana MLA Salary: हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठी आज, ८ ऑक्टोबर रोजी मतमोजणी सुरु आहे. या निवडणुकीत हरयाणामध्ये भाजप सलग तिसऱ्यांदा सत्ता राखू शकेल की, भाजपचा काँग्रेसकडून पराभव होणार, याबद्दल देशभरात विलक्षण उत्सुकता आहे. दरम्यान, हरयाणाच्या आमदारांना मिळणारे वेतन किती आणि त्यांना कोणत्या सुविधा मिळतात? त्याबद्दल जाणून घेऊया.

हरयाणात निवडणूक जिंकणाऱ्या आमदारांना दरमहा 60,000 रुपयांचे वेतन मिळते. वेतनव्यतिरिक्त त्यांना दर महिन्याला टेलिफोनसाठी 15,000 रुपये आणि कार्यालयीन खर्चासाठी 25,000 रुपये मिळतात. एवढेच नाही तर आमदारांना 10,000 रुपये आदरातिथ्य भत्ताही दिला जातो. तसेच, दैनंदिन खर्चासाठी त्यांना दरमहा 30,000 रुपये वेगळे दिले जातात.

विधानसभा मतदारसंघात फिरण्यासाठी आमदारांना दरमहा 60,000 रुपये भत्ता मिळतो. एवढेच नाही तर त्यांना विधानसभेच्या अधिवेशनात उपस्थित राहण्यासाठी 15 हजार रुपये अतिरिक्त खर्च मिळतो. याशिवाय हरयाणाबाहेर प्रवास करण्यासाठी प्रतिदिन 5 हजार रुपये दिले जातात. तसेच, आमदारांना ए श्रेणीतील अधिकाऱ्यांप्रमाणे वैद्यकीय सुविधा मिळतात.

गाडी आणि प्रवासासाठी काय सुविधा?हरयाणात आमदारांना गाडीसाठी 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते, तर घरासाठी 60 लाख रुपयांचे गृहकर्ज दिले जाते. घराच्या दुरुस्तीसाठी 10 लाख रुपयेही उपलब्ध आहेत. प्रवासाबद्दल बोलायचे झाले तर आमदारांना रेल्वे आणि विमानाने फर्स्ट क्लासमध्ये प्रवास करण्याची सुविधा मिळते. हरयाणाचे आमदार दरवर्षी 3 लाख रुपयांपर्यंत मोफत प्रवास करू शकतात आणि 18 रुपये प्रति किलोमीटर दराने रस्ता प्रवास भत्ता देखील मिळवू शकतात. याशिवाय, त्यांना वर्षाला 15 लाख रुपयांचे अनुदानही मिळते.

2017 मध्ये वाढले होते आमदारांचे पगार 2017 मध्ये हरयाणात आमदार, मंत्री, राज्यमंत्री, सभापती, उपसभापती आणि विरोधी पक्षनेते यांचे वेतन आणि भत्ते वाढवण्यात आले होते. या सर्वांच्या पगारात 10,000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी आमदारांना दरमहा 50 हजार रुपये पगार मिळत होता, तो वाढवून 60 हजार रुपये करण्यात आला आहे. याशिवाय, मंत्री, राज्यमंत्री, सभापती आणि उपसभापती यांचा कार्यालय भत्ता 20 हजार रुपये करण्यात आला आहे. ही वाढ 1 एप्रिल 2016 पासून लागू करण्यात आली.

टॅग्स :haryana assembly election 2024हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४MLAआमदारElectionनिवडणूक 2024