शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

OM Prakash Chautala : माजी मुख्यमंत्री चौटाला वयाच्या 87 व्या वर्षी 10वी, 12वी उत्तीर्ण; अभिषेक बच्चननं केलं अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 19:40 IST

खरे तर चौटाला यांनी 2019 मध्ये 10वीचे पेपर दिले होते. मात्र, काही  कारणामुळे ते इंग्रजीचा पेपर देऊ शकले नव्हते. यामुळे इंग्रजी विषयाचा निकाल येऊ न शकल्याने हरियाणा बोर्डाने त्याचा 12वीचा निकाल राखून ठेवला होता.

शिक्षणाला वयाचे बंधन नसते, हे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री तथा इंडियन नॅशनल लोकदलचे सर्वेसर्वा चौधरी ओम प्रकाश चौटाला (OM Prakash Chautala) यांनी सिद्ध केले आहे. चौटाला यांनी सोमवारी वयाच्या 87 व्या वर्षी हरियाणा बोर्डाकडून दहावी आणि बारावीची गुणपत्रिका मिळवली आहे. चौटाला महाराणा प्रतापांच्या 428व्या जयंती निमित्त आयोजित एका कार्यक्रमात प्रमुख पाहुने म्हणून उपस्थित होते. येथेच हरियाणा बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी चौटाला यांना 10वी आणि 12वीचे गुणपत्रक देऊन त्यांचा सन्मान केला.

खरे तर चौटाला यांनी 2019 मध्ये 10वीचे पेपर दिले होते. मात्र, काही  कारणामुळे ते इंग्रजीचा पेपर देऊ शकले नव्हते. यामुळे इंग्रजी विषयाचा निकाल येऊ न शकल्याने हरियाणा बोर्डाने त्याचा 12वीचा निकाल राखून ठेवला होता. यानंतर, ऑगस्ट 2021 मध्ये त्यांनी पुन्हा इंग्रजीचा पेपर दिला आणि 88 गुण मिळवले.

अभिषेक बच्चननं केलं अभिनंदन - गेल्या 7 एप्रिल 2022 रोजी माजी मुख्यमंत्री चौटाला यांच्या जीवनाशी मिळता जुळता 'दसवी' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात एका जाट नेत्याची कथा आहे. अभिषेक बच्चनने एका न्यूज पोर्टलची बातमी शेअर करत ओम प्रकाश चौटाला यांचे अभिनंदन केले आहे. तसेच, #दसवी असेही म्हटले आहे. 

टॅग्स :HaryanaहरयाणाChief Ministerमुख्यमंत्रीAbhishek Bacchanअभिषेक बच्चन