शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

हरियाणामध्ये मुख्यमंत्री मनोहर खट्टरांसमोर बहुरंगी आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 02:24 IST

भाजपचे मिशन ७५; काँग्रेस, आयएनएलडी, जननायक जनता पार्टी, आप मैदानात

महाराष्ट्रासोबत हरियाणा राज्याची निवडणूक जाहीर झाली असून, ९० जागांवर २१ आॅक्टोबरला मतदान होणार आहे. काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडत २०१४ मध्ये भाजपने पहिल्यांदा हरियाणात सत्ता मिळविली आहे. ही सत्ता कायम राखण्याचे आव्हान मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यासमोर असणार आहे. त्यांना काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुडा यांच्यासह चार प्रमुख पक्षांचा सामना करावा लागणार आहे.२०१४ च्या निवडणुकीत मोदी लाटेमुळे भाजपने चार जागांवरून ४७ जागांवर हनुमान उडी घेऊन सत्ता मिळविली. ओमप्रकाश चौटाला यांच्या इंडियन नॅशनल लोकदलाला (आयएनएलडी) १९ जागा, तर काँग्रेसला अवघ्या १५ जागांवर समाधान मानावे लागले. सलग दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या भूपिंदरसिंह हुडा यांना सत्तेतून बाहेर व्हावे लागले. २०१९ च्या निवडणुकीसाठी भाजपने मिशन ७५ चा नारा दिला असून, त्यादृष्टीने त्यांनी प्रचार सुरू केला आहे. पण, यावेळी भाजपला काँग्रेससोबत आयएनएलडी व जननायक जनता पार्टी (आयएनएलडीमध्ये फूट पडून तयार झालेला पक्ष ) बसप, आप, स्वराज इंडिया पार्टी या पक्षांचादेखील सामना करावा लागणार आहे. त्यामुळे यंदा हरियाणामध्ये बहुरंगी लढती होण्याची चिन्हे आहेत. भाजपने इतर पक्षांसोबत हातमिळवणी करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याला फारसे यश आले नाही. अजय चौटाला यांच्या जननायक जनता पार्टीसोबत युती करण्याचा प्रयत्न झाला, पण तो अर्धवट राहिला.लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसला होता. १० पैकी १० जागा भाजपने पटकावल्यानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळून आली. माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुडा यांनी पक्षापासून फारकत घेत सवतासुभा मांडण्याचा प्रयत्न केला; पण काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी खास करून सोनिया गांधी यांनी यावर तोडगा काढून विधानसभा नेतेपदी हुडा यांची नेमणूक केली. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी शैलजा कुमारी यांची नेमणूक करून डागडुजी केली. त्यामुळे लोकसभेनंतर बॅकफूटवर गेलेल्या काँग्रेसमध्ये नव्या बदलामुळे चैतन्य निर्माण होऊन भाजपसमोर आव्हान निर्माण केले आहे. हरियाणाच्या राजकारणात जाट मतदार महत्त्वाचा घटक असून, त्यांच्या भोवती राजकारण चालते. जाट मतदार यावेळी कोणाच्या पाठीशी राहणार यावर सत्तेचे गणित अवलंबून राहणार आहे.इतर पक्षांमध्ये बसपने राज्यातील १७ आरक्षित जागांवर लक्ष केंद्रित केले आहे. या जागांपैकी जास्त जागा मिळवून सत्तेच्या दावेदारीत आपली भूमिका वाढविण्याचे नियोजन बसप करीत आहे. आयएनएलडीला लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षात झालेल्या फुटीचा जबर फटका बसला. लोकसभेच्या दोन्ही जागा त्यांना गमवाव्या लागल्या. डिसेंबर २०१८ मध्ये दुष्यंत चौटाला यांनी स्थापन केलेल्या जननायक जनता पार्टीचेदेखील यावेळी प्रमुख आव्हान असणार आहे. आप व स्वराज इंडिया पार्टीदेखील विधानसभेत आपले नशीब अजमावणार आहे. ‘आप’ने लोकसभेला जननायक पार्टीसोबत आघाडी करून निवडणूक लढविली होती.भाजपची लोकसभेतील कामगिरीसर्वच्या सर्व १० जागा जिंकल्याएकूण ५८ टक्के मतदान मिळविले७९ विधानसभा मतदारसंघांत आघाडी१० मतदारसंघांत काँग्रेसला आघाडीप्रमुख मुद्देकलम ३७० रद्द करणेराष्ट्रीय नागरिकत्व रजिस्टरजाटेतर मुख्यमंत्रीआर्थिक मंदी, शेतकऱ्यांचे प्रश्नगुडगाव परिसरातील उद्योगांना मंदीचा फटकामाजी मुख्यमंत्री हुडा यांनी पक्षापासून फारकत घेत सवतासुभा मांडण्याचा प्रयत्न केला; पण काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी खास करून सोनिया गांधी यांनी यावर तोडगा काढून विधानसभा नेतेपदी हुडा यांची नेमणूक केली.

टॅग्स :HaryanaहरयाणाElectionनिवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस