शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचा बहुमताचा प्रश्नच मिटला; अपक्ष येणार मदतीला धावून?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 22:16 IST

अपक्षांच्या मदतीनं सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू

चंदिगढ: महाराष्ट्रात शिवसेनेच्या साथीनं सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत असलेल्या भाजपाला हरयाणात जोरदार झटका बसला आहे. भाजपाला एकहाती सत्ता मिळेल, असा अंदाज पक्षाच्या नेत्यांना होता. मात्र भाजपा बहुमतापासून 6 जागा दूर आहे. त्यामुळे आता भाजपानं अपक्षांच्या मदतीनं सत्ता स्थापन करण्याच्या तयारी सुरू केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरल्यानं भाजपाच्या वतीनं मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर राज्यपाल सत्यनारायण यांची भेट घेवून सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. दिवाळीच्या आधी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हरयाणात विधानसभेच्या 90 जागा आहेत. त्यापैकी 39 जागांवर भाजपानं विजय मिळवला असून एका जागेवर आघाडी घेतली आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी 46 आमदारांचा पाठिंबा आवश्यक असतो. सध्याची आकडेवारी पाहता भाजपाला सत्ता स्थापन करण्यासाठी 6 आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. राज्यात काँग्रेसला 31 जागांवर यश मिळालं आहे.भाजपानं सध्या अपक्षांच्या मदतीनं सत्ता स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. हरयाणात 7 अपक्ष आमदार विजयी झाले आहेत. यातील 5 जण आधी भाजपात होते. मात्र पक्षानं तिकीट नाकारल्यानं त्यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवली. त्यामुळे या पाच आमदारांची समजूत काढणं भाजपासाठी सोपं ठरू शकतं. भाजपानं त्या दृष्टीनं पावलं टाकण्यासदेखील सुरुवात केली आहे. त्यामुळे पडद्यामागे वेगानं घडामोडी सुरू असल्याचं समजतं आहे.

टॅग्स :haryana election 2019हरियाणा निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस