शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेची खदखद, विधानसभेची चिंता, महायुतीत ठिणगी पडली? "भुजबळांना आवरा"; निलेश राणे संतापले
2
जगप्रसिद्ध पण पुण्यात बदनाम झालेल्या पोर्शे कारच्या टीमने डेटा मिळविला; बिल्डर 'बाळा'ची कुंडली मिळणार...
3
"मी काय मूर्ख नाही, भाजपचं मोठा भाऊ"; विधानसभेच्या जागांवरुन भुजबळांची नरमाईची भूमिका
4
IPL 2024 : सोशल मीडियावर कोणाचा कल्ला? धोनी आणि मुंबई इंडियन्सचा जलवा कायम!
5
RBI नंतर LIC भरणार सरकारी खजाना, ₹३,६६२ कोटींचा डिविडेंड देण्याची केली घोषणा
6
निवडणूक निकालानंतर 'खेला होबे'..! INDIA आघाडीच्या बैठकीपासून ममता बॅनर्जी दूर का?
7
“राहुल गांधी ना सैन्यात भरती होऊ शकत, ना स्वतः काही कमावू शकत, आईवर ओझे”; भाजपाची टीका
8
प्रेमासाठी बदलला धर्म, शिफा झाली संध्या; कुटुंबीयांचा विरोध, हिंदू रितीरिवाजांनुसार केलं लग्न
9
डेरा प्रमुख राम रहीमला मोठा दिलासा, माजी मॅनेजर रणजीत हत्येप्रकरणी हायकोर्टाने निर्दोष ठरवले
10
UPI पेमेंट्स आणि ई-कॉमर्समध्ये Adani एन्ट्रीच्या तयारी; Google, Paytm ला मिळणार टक्कर
11
तेरी गली में आया भूल के...! Ananya Pandey चा KKR च्या शिलेदारांसोबत डान्स, VIDEO
12
"नात्याचा विचार करू की...", 'मित्र' पटनायक यांच्यासोबत का होऊ शकली नाही युती? PM मोदी स्पष्टच बोलले
13
“लोकसभा निवडणुकीत काय होईल हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही”; अजित पवारांचे विधान चर्चेत
14
Video - ट्यूमर सर्जरीनंतर राखी सावंतची झाली वाईट अवस्था; चालणंही झालं अवघड
15
प्रशांत किशोर यांचे 'हे' ५ अंदाज ज्यानं भाजपाला दिलासा तर विरोधकांना धडकी भरली
16
मिझोराममध्ये दगडाच्या खाणीत भूस्खलन; 10 मजुरांचा मृत्यू, अन्य ढिगाऱ्याखाली अडकले
17
उंदराला मांजर साक्ष! ससूनच्या डॉक्टरांची चौकशी करणारे डॉक्टर गंभीर प्रकरणांत अडकलेले; माजी सनदी अधिकाऱ्यांचा आक्षेप
18
Fact Check : "अबकी बार 400 पार..."; असं म्हणणाऱ्या व्यक्तीचा 'तो' व्हायरल Video स्क्रिप्टेड
19
मराठमोळ्या अभिनेत्याचा कान्स फेस्टिव्हलमध्ये स्वॅग! साध्या पण रुबाबदार लूकने जिंकली मनं
20
'एलआयसी'ची मोठी तयारी! आता LIC देणार हेल्थ इन्शुरन्स; कंपनीने दिले संकेत

 haryana election 2019 : हरयाणाची त्रिशंकू विधानसभेकडे वाटचाल, भाजपाला जबरदस्त धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 12:04 PM

हरयाणामध्ये भाजपाला जबरदस्त धक्का बसला आहे. हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे कल हाती येऊ लागले आहेत.

चंदिगड - हरयाणामध्येभाजपाला जबरदस्त धक्का बसला आहे. हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे कल हाती येऊ लागले आहेत. हरयाणातील ९० जागांपैकी सर्व जागांचे कल आता हाती आले आहे. या कलांमधून हरयाणामध्ये त्रिशंकू विधानसभेचे चित्र दिसत आहे. आतापर्यंतच्या कलांमध्ये भाजपा ४१ तर काँग्रेस २९ जागांवर आघाडीवर आहे. राज्यात जननायक जनता पार्टी किंगमेकर ठरण्याच्या मार्गावर आहे. जननायक जनता पक्षाला १२ जागांवर आघाडी आहे. तर इतर आठ ठिकाणी आघाडीवर आहे. 

हरयाणा सरकारमधील भाजपाचे अनेक मंत्री पराभवाच्या छायेत आहेत. तसेच बहुमतासाठी आवश्यक असलेला ४६ जागांचा आकडा गाठणेही भाजपाला अवघड होताना दिसत आहे. त्यामुळे  हरयाणात सरकार स्थापनेमध्ये जननायक जनता पार्टी आणि इतर पक्षांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. हरयाणा विधानसभेमध्ये एकूण ९० जागा असून, येथे भाजपा, काँग्रेस, जेजेपी आणि इंडियन नॅशनल लोकदल यांच्यात चुरस आहे.  २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत हरयाणामध्ये भाजपाने संपूर्ण बहुमत मिळवले होते. यावेळी हरयाणामध्ये विस्कळीत विरोधी पक्षाचा लाभ घेऊन भाजपा  जोरदार मुसंडी मारेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसने भाजपाला जोरदार टक्कर दिली आहे.   

टॅग्स :haryana election 2019हरियाणा निवडणूकHaryanaहरयाणाBJPभाजपाcongressकाँग्रेस