शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

हरयाणातील गोहानाच्या जिलेबीची 'तारीफ' राहुल गांधींना महागात पडली! काय म्हणाला दुकानदार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 14:34 IST

या निवडणुकीत भाजपला बहुमतापेक्षा 45 पेक्षा तीन जागा अधिक अर्थात 48 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला 36 जागा मिळाल्या आहेत. म्हणजेच हरयाणामध्ये भाजप स्वबळावर सरकार स्थापन करताना दिसत आहे. 

हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर, राज्यात सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती जिलेबीची. राजकारणातील तज्ज्ञांपासून ते राज्यातील स्थानिक जनतेपर्यंत सर्वच जण जिलेबीसंदर्भात सोशल मीडिया पोस्ट करताना आणि काँग्रेसची खिल्ली उडवताना दिसत आहेत. यासंदर्भात आता राहुल गांधी यांनी गोहानातील ज्या दुकानाची 'तारीफ' केली होती, त्या दुकानाच्या दुकानदाराचीही प्रतिक्रिया आली आहे. 

राहुल गांधी यांनी गोहानात खाल्ली होती जिलेबी - हरयाणा  विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोनीपतच्या गोहानामध्ये एका सभेला संबोधित केले होते. यावेळी, काँग्रेस खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा यांनी त्यांना गोहानाची जलेबी भरवली होती. यावेळी राहुल गाधी यांनी गोहानातील जिलेबीची दबरदस्त तारीफ केली होती. एवढेच नाही तर राहुल गांधी आपली बहीण प्रियांका गांधींसाठीही येथून जिलेबी घेऊन गेले होते. हरयाणा विधानसभा निवडणुका निकाल समोर आल्यानंतर, जिलेबी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जबरदस्त ट्रेंड करत आहे.

जिलेबी दुकानाचा दुकानदार काय म्हणाला? -जिलेबी तयार करणाऱ्या दुकानदाराने म्हटले आहे, "राहुल गांधी यांनी जिलेबीचे कौतुक केले होते. ही जिलेबी देशी तुपात करण्यात आली आहे. ती एक आठवड्यांपेक्षाही अदिक दिवस टिकते. जर राहुल गांधी यांनी कौतुक केले असले तर, नक्कीच आयटममध्ये दम असेल. सर्वसामान्य लोकही आमच्या जिलेबीचे कौतुक करतात."

'जिलेबी फॅक्ट्रीतील वस्तू नाही' -ते पुढे म्हणाले, "ही जिलेबी म्हणजे एखाद्या फॅक्ट्रीतील वस्तू नाही. हा दुकानात बनवला जाणारा पदार्थ आहे. येथे दहा लोक जिलेबी तयार करतात आणि आपली सेवा करतात. आमचे तीन दुकान आहेत. हे दुकान मी जन्माला येण्यापूर्वीचे आहे. मी गेल्या 22-23 वर्षांपासून येथे काम करतो. संपूर्ण माल देशी तुपात तयार केला जातो. येथील जिलेबी भारताबरोबरच परदेशातूनही मागणी आहे.

जनतेनं खिल्ली उडवली -राहुल गांधी सोनीपतमध्ये एका जाहीर सभेसाठी आले होते. तेव्हा त्यांनी, जिलेबी खाल्ल्यानंतर जिलेबीची फॅक्ट्री लावण्याबरोबरच कामगारांना प्रोत्साहन देण्यासंदर्भात भाष्य केले होते. त्यांच्या फॅक्ट्रीसंदर्भातील वक्तव्यावरून भाजप समर्थकांनी त्यांच्यावर निशाणा सधायला सुरुवात केली होते आणि मोठ्या प्रमाणावर मिम्स देखील तयार केले होते. यासंदर्भात स्थानिक लोकही राहुल गांधी यांची जबरदस्त खिल्ली उडवताना दिसत होते. निवडणूक निकालानंतर, हरयाणातील जनतेला विकासाची जिबेली हवी आहे. त्यांना माहीत आहे की, जिलेबी फॅक्ट्रीत नव्हे तर हलवाईच्या दुकानात तयाह होते, असे जनता म्हणत आहे.

या निवडणुकीत भाजपला बहुमतापेक्षा 45 पेक्षा तीन जागा अधिक अर्थात 48 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला 36 जागा मिळाल्या आहेत. म्हणजेच हरयाणामध्ये भाजप स्वबळावर सरकार स्थापन करताना दिसत आहे.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसharyana assembly election 2024हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४