शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

Haryana Assembly Election Results 2024 हरियाणात भाजपचा विजयी रथ का रोखू शकली नाही काँग्रेस? ही आहेत 5 महत्वाची कारणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 15:50 IST

Haryana Assembly Election Results 2024: महत्वाचे म्हणजे, काँग्रेसला मोठा विजय मिळेल, असा दावा सर्वच एक्झिट पोलमध्ये करण्यात आला होता. तो फोल ठरला आहे.

हरियाणामध्ये भारतीय जनता पक्ष सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करताना दिसत आहे. तर काँग्रेसचा 2014 पासून सलग तिसऱ्यंदा पराभव झाला आहे. आतापर्यंत आलेल्या निकालात भाजप 49 जागांवर आघाडीवर दिसत आहे. महत्वाचे म्हणजे, काँग्रेसला मोठा विजय मिळेल, असा दावा सर्वच एक्झिट पोलमध्ये करण्यात आला होता. तो फोल ठरला आहे.

आज अर्थात मंगळवारी हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल यायला सुरूवात झाली, तेव्हा काँग्रेस आघाडीवर दिसत होती. काही क्षणांसाठी तर हरियाणात काँग्रेस भाजपचा विजय रथ रोखेल आणि सत्तेत येईल, असेही वाटू लागले होते. मात्र जस-जशी मत मोजनी पुढे सरकत गेली, तस-तशी काँग्रेस मागे पडत गेली आणि भाजपने बहुमताचा आकडा गाठला. यानंतर आता, हरियाणात काँग्रेसचा पराभव का झाला? काँग्रेस भाजपचा विजयी रथ का रोखू शकली नाही? यासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे.

ही आहेत काँग्रेसच्या पराभवाची 5 महत्वाची कारणं -

काँग्रेसमधील गटबाजी -पक्षातील गटबाजी, हे काँग्रेसच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण मानले जात आहे. कुमारी शैलजा यांची नाराजीही आता समोर आली आहे. अशोक तंवर यांचे परत येणेही काँग्रेसचे डॅमेज कंट्रोल करू शकले नाही

अँटी इंकंबन्सीच्या भरवशावर - काँग्रेस पक्ष अनेक जागांवर 10 वर्षांतील अँटी इंकंबन्सीच्या भरवशावर दिसला. याशिवाय, जून 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पाच जागांवर विजय मिळवणारी काँग्रेस अति आत्मविश्वासात दिसली. 

संविधान आणि आरक्षणाचा मुद्दा भाजपची रणनीती भेदू शकला नाही -लोकसभा निवडणुकीत संविधान आणि आरक्षणाचा मुद्द्यावरून बाजप विरोधात तुतारी वाजवणाऱ्या काँग्रेसने हा डाव हरियाणातही खेळला. मात्र त्यांना तेथे भाजपच्या रणनीतीला भेदता आले नाही.

अनेक नेते आपल्याच जागांपुरते मर्यादित राहिले -काँग्रेसचे अनेक नेते आपल्याच जागांपुरते मर्यादित राहिले. याशिवाय, निवडणुकीदरम्यान इतर पक्षांतून आलेल्या लोकांना पक्षात घेणेही काही जागांवर अंगलट आले.

भाजपच्या लाभार्थी वर्गाला पर्याच शोधता आला नाही -हरियाणा काँग्रेसला, भाजपच्या लाभार्थी वर्गाला पर्याच शोधता आला नाही. याशिवाय, कुस्तीपटू आणि शेतकऱ्यांचा मुद्दाही फारसा फायद्याचा ठरला नाही.

टॅग्स :haryana assembly election 2024हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसBJPभाजपा