शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

"कुठे आम्ही ६० जागा जिंकण्याच्या बाता मारत होतो आणि…’’, निकालांबाबत कुमारी शैलजा म्हणाल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 18:47 IST

Haryana Assembly Election Result 2024: हरयाणा विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे काँग्रेसच्या नेत्यांना मोठा धक्का बसला आहे. या पराभवानंतर राज्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि खासदार कुमारी शैलजा (Kumari Shailaja) यांनी या पराभवाचं परखड परीक्षण झालं पाहिजे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

हरयाणा विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला अनपेक्षितरीत्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे राज्यात हमखास सत्ता येणार, अशी आशा बाळगून असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना मोठा धक्का बसला आहे. या पराभवानंतर राज्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि खासदार कुमारी शैलजा यांनी या पराभवाचं परखड परीक्षण झालं पाहिजे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच पक्षांतर्गत काहीतरी मोठी चूक झाली, त्यामुळे पक्ष अडचणीत सापडला, असे कुमारी शैलजा यांनी म्हटले आहे.  कुमारी शैलजा यांनी मतमोजणी शेवटच्या टप्प्यात असताना प्रतिक्रिया देताना सांगितले की, आम्ही ६० जागा जिंकून येण्याबाबत बाता मारत होतो. मात्र आता आम्हाला संघर्ष करावा लागत आहे, असं दिसत आहे. अंतिम निकाल काय असेल हे पाहावं लागेल. मात्र तो चांगला नसेल, याची मला जाणीव आहे.  

हरयाणा विधानसभा निवडणुकीत आमच्याकडून कॅल्क्युलेशनमध्ये चूक झाली आहे. एकीकडे आम्ही ६० जागांवर विजय मिळवण्याची अपेक्षा बाळगत होतो.  मात्र आता आम्ही संघर्ष करत आहोत. आम्ही केवळ अपेक्षा बाळगू शकतो. मात्र अंतिम निकालांनंतरच याबाबतच्या कारणांची चर्चा होऊ शकते. एकीकडे आम्ही पूर्णपणे  क्लीन स्विप करू इच्छित होतो. मात्र आमच्याकडून काही चूक झाली की भाजपानं काही खेळ केला, हे आपल्याला पाहावं लागेल, असे त्या म्हणाल्या.  कुमारी शैलजा यांनी पुढे सांगितले की, मी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच आम्ही काही जागा जिंकल्याही आहेत. मात्र आम्ही संपूर्ण राज्यात का विजय होऊ शकलो नाही, याचा विचार आम्हाला करावा लागेल. याचं व्यापक मूल्यांकन आवश्यक करणं आवश्यक आहे. 

दरम्यान, हरयाणा विधानसभा निवडणुकीचे सर्व निकाल जवळपास जाहीर झाले असून, त्यात भाजपाने ४८, काँग्रेसने ३७, आयएनएलडीने २ आणि अपक्षांनी ३ जागा जिंकल्या आहेत. 

टॅग्स :haryana assembly election 2024हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेस