हरसूल दंगलीतील आरोपींना न्यायालयीन कोठडी
By Admin | Updated: July 20, 2015 23:59 IST2015-07-20T23:59:23+5:302015-07-20T23:59:23+5:30

हरसूल दंगलीतील आरोपींना न्यायालयीन कोठडी
>नाशिक : हरसूल आणि ठाणापाडा येथे उसळलेल्या दंगलीप्रकरणी अटकेत असलेल्या ९० आरोपींपैकी ४३ संशियतांना सोमवारी कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली. दंगलग्रस्त भागातील जनजीवन पूर्वपदावर येत असून दैनंदिन व्यवहार सुरु ळीत होत झाले आहेत.युवकाच्या मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल न करता आकस्मिक मृत्यूची नोंद करून संशियतांना पोलीस पाठिंबा देत असल्याचा आरोप करीत हरसूलवासियांनी १४ जुलैला बंद पुकारला होता. बंदला हिंसक वळण लागून हरसूलमध्ये दंगल उसळली. पोलिसांच्या गोळीबारात एका युवकाचा मृत्यू झाला, तर गावकर्यांच्या दगडफेकीत पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले होते. (प्रतिनिधी)