हर्षा
By Admin | Updated: February 13, 2015 00:38 IST2015-02-13T00:38:24+5:302015-02-13T00:38:24+5:30
टीम इंडियाची ताकद कमी झाली

हर्षा
ट म इंडियाची ताकद कमी झालीहर्षा भोगलेभारतीय संघ गतविजेता असला तरी या वेळी या संघाचा जेतेपदाच्या दावेदारांमध्ये समावेश नाही. जर विश्वकप स्पर्धेचे आयोजन भारतात झाले असते, तर गतचॅम्पियन संघाचा निश्चितच जेतेपदाच्या दावेदारामध्ये समावेश असता. पण, आता येथील परिस्थितीमुळे भारतीय संघाची ताकद हिसकावल्या गेली आहे. भारतीय संघ विश्वकप स्पर्धेत कशी कामगिरी करतो, याची जगातील चाहत्यांना प्रतीक्षा आहे. भारतीय संघ ८ फलंदाज आणि ५ गोलंदाजांसह समतोल साधण्यासाठी प्रयत्नशील असतो. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि काहीअंशी श्रीलंका संघाचा समतोल अशाच पद्धतीने साधला गेल्याचे दिसून येत आहे. उर्वरित संघांना चमकदार कामगिरी करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. भारतीय संघही याच गटात मोडतो. भारतासाठी गोलंदाजी चिंतेची बाब आहे. उमेश यादव व मोहंमद शमी यांच्याकडे प्रतिभा आहे; पण या दोन्ही गोलंदाजांना कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. युवा खेळाडूंसाठी ही चांगली संधी आहे. भारतीय गोलंदाजीचे नेतृत्व करताना या गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघांवर वर्चस्व गाजविणे आवश्यक आहे; पण कामगिरीत सातत्य राखता न आल्यामुळे त्यात ते अपयशी ठरले आहे. सामन्याचा निकाल सुरुवातीला विकेट घेण्यावर अवलंबून असतो. गोलंदाजांसाठी अखेरच्या षटकांत वर्चस्व गाजविण्यासाठी सुरुवातीला बळी घेणे आवश्यक आहे. भारतीय संघाला सुरुवातीला बळी घेण्यात यश मिळत नाही; त्यामुळे अखेरच्या षटकांमध्ये धावगतीवर अंकुश राखणे भारतीय गोलंदाजांना अडचणीचे भासत आहे. ०००