रामेश्वरीच्या जिद्दीला सलाम

By Admin | Updated: June 3, 2014 00:59 IST2014-06-03T00:59:28+5:302014-06-03T00:59:28+5:30

अकोला - घरची परिस्थिती बेताचीच. आई-वडील काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात तर त्यांची मुलगीही सुटीच्या दिवशी कामाला जाते. अशा परिस्थितीत शिक्षण घेत असलेल्या रामेश्वरीने आपल्या संकटांवर मात करीत जिद्दीच्या बळावर बारावीच्या परीक्षेत कला शाखेत ८१.५३ टक्के गुण प्राप्त केले. कौलखेड परिसरात असलेल्या प्राजक्ता ज्युनिअर कॉलेजमधून ती प्रथम आली असून, तिच्या जिद्दीला येथील शिक्षकही सलाम करतात.

Harmony of Rameshwari | रामेश्वरीच्या जिद्दीला सलाम

रामेश्वरीच्या जिद्दीला सलाम

ोला - घरची परिस्थिती बेताचीच. आई-वडील काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात तर त्यांची मुलगीही सुटीच्या दिवशी कामाला जाते. अशा परिस्थितीत शिक्षण घेत असलेल्या रामेश्वरीने आपल्या संकटांवर मात करीत जिद्दीच्या बळावर बारावीच्या परीक्षेत कला शाखेत ८१.५३ टक्के गुण प्राप्त केले. कौलखेड परिसरात असलेल्या प्राजक्ता ज्युनिअर कॉलेजमधून ती प्रथम आली असून, तिच्या जिद्दीला येथील शिक्षकही सलाम करतात.
रामेश्वरी मुलनकर हिचे वडील खेड्यापाड्यात सायकलने फिरून चहापत्ती विक्रीचा व्यवसाय करतात तर त्यांच्या मदतीसाठी आई पुंगळीच्या कारखान्यात काम करून आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा गाढा चालविते. रामेश्वरीला आणखी दोन बहिणी असून, एकीचा विवाह झाला आहे. तर तिची लहान बहीण तेजस्विनी ही दहावीला आहे. रामेश्वरीच्या आई-वडिलांनी संसाराचा गाडा हाकताना मुलीच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. रामेश्वरीचे आई-वडील मुलींच्या शिक्षणासाठी रात्रं-दिवस झटत असताना त्यांच्या मुलीनेदेखील त्यांच्या मेहनतीचे चिज केले. रामेश्वरीला प्रशासकीय सेवेत जायचे आहे; मात्र तिला याविषयी जास्त माहिती नाही. बी.ए. करून आपण प्रशासकीय सेवेचा अभ्यास करणार असल्याचे तिचे म्हणणे आहे. एमपीएससी आणि यूपीएससी या दोन्ही प्रशासकीय सेवांविषयी लहानपणापासूनच खूप ऐकून असून आपण याच क्षेत्रात मोठे होण्याची अपेक्षा तिने व्यक्त केली.
फोटो - 03 सीटीसीएल २०१

Web Title: Harmony of Rameshwari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.