शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
4
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
5
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
6
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
7
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
8
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
9
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
10
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
11
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
12
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
13
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
14
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
15
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
17
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
19
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
20
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  

सावधान! फळांसोबत पोटात जात आहेत घातक रसायने; गंभीर आजारांची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2024 08:42 IST

फळांसोबत दररोज ०.६५ मायक्रो ग्रॅम घातक रसायने पोटात घेत असल्याचे संशोधनातून समोर

नवी दिल्ली : भाज्या आणि फळे सकस मानली जातात. रोजच्या आहारात त्यांचा समावेश केला जातो. सिझन संपला तरी काही फळे बाजारात हमखास मिळत असतात. त्यामुळे त्यांचे सेवन दररोज केले जात असते; परंतु या फळांसोबत तुम्ही दररोज ०.६५ मायक्रो ग्रॅम घातक रसायने पोटात घेत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. 

छत्तीसगडमधील इंदिरा गांधी कृषी महाविद्यालयाचे कीटक विज्ञानाचे वैज्ञानिक डॉ. गजेंद्र चंद्राकर यांनी केलेल्या संशोधनात हा खुलासा झालेला आहे. बाजारात विकण्यासाठी फळे बागेतून शहरात आणावी लागतात. मार्केटमध्ये साठवून ठेवावी लागतात. या काळात फळे टिकावीत, त्यांचे आयुष्य वाढावे, ती लवकर खराब होऊ नयेत यासाठी डीडीटी, इथरेल तसेच जिब्रालिकचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असतो. घातक रसायनांचा वापर करून ती पिकविली जातात मगच तुम्हा-आम्हाला विकली जात असतात. 

फळे टिकवणे आणि पिकवण्यासाठी वापरलेल्या घातक रसायनांमुळे त्वचेचे विकार, डायबेटिस, पीसीओडी विकार होण्याचा धोका वाढतो. सध्या सफरचंद आणि द्राक्षांचा सिझन नाही. तरीही ही फळे बाजारात उपलब्ध आहेत. कारण अनेक महिने शीतगृहात ठेवलेली फळे आता विक्रीसाठी बाहेर काढण्यात आली आहेत.

कोणत्या दुष्परिणामांची भीती? लहान वयात चष्मा लागणे एकाग्रता कमी होणे तणाव वाटणेभूक न लागणेडोळ्यांभोवती काळा पट्टा कॅन्सर आजारअस्थमा होण्याची भीती

अधिक काळ टिकावी यासाठी फळांचे लसीकरण होते. द्राक्षांवर डायक्लोवास २६ हे रसायन वापरतात. द्राक्षे टिकून रहावी यासाठी डीडीटीचा वापर होतो. 

फळांमध्ये घातक रसायने किती?आंबा ०.६५६८ सफरचंद ०.६०८६ द्राक्षे ०.५८३७ गाजर ०.३४६९केळी ०.२२२१ 

३०% पेक्षा अधिक कीटकनाशकेबाजारात विकल्या जाणाऱ्या शेकडो फळांमध्ये ३० टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात कीटकनाशके असल्याचे अनेक वैज्ञानिक अभ्यासात आढळले आहे. एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जादा प्रमाणात कीटकनाशकांचा वापर म्हणजे मोठ्या आजारांना निमंत्रण ठरते. 

कोणती काळजी घ्यावी?

फळे खाण्याआधी कमीत कमी तीन तास पाण्यात बुडवून ठेवा.मोसमात येणाऱ्या फळांचे सेवन करण्यास प्राधान्य द्या.हायब्रीड फळांचा वापर कमीत कमी करावा 

टॅग्स :Healthआरोग्यfruitsफळे