शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

...अन् सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती निकालावेळी रडू लागले; हरीश राणाला इच्छामरणाची परवानगी देताना काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 16:08 IST

Harish Rana Case: हरीश राणा गेल्या १३ वर्षांपासून कोमात होता, पण त्याच्या प्रकृतीत जराही सुधारणा होत नव्हती

Harish Rana Case: सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक ऐतिहासिक निर्णय घेतला. ३२ वर्षीय हरीश राणा याला इच्छामरणाची परवानगी देण्यात आली. भारतात अशाप्रकारच्या पॅसिव्ह युथनेशियाचा (Passive Euthanasia) हा पहिलाच निकाल ठरला. हा निर्णय दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात काही काळ शांत आणि उदास वातावरण निर्माण झाले होते. निकाल देताना न्यायमूर्ती जे.बी. पार्डीवाला भावनिक झाले आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळल्याचे दिसून आले. न्यायमूर्ती जे.बी. पार्डीवाला आणि के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने हरीश राणा याच्या पालकांना व्हेंटिलेटर व जीवन-आवश्यक कृत्रिम वैद्यकीय पद्धती काढण्याची परवानगी दिली. कारण हरीश राणा गेल्या १३ वर्षांपासून कोमात होता.

न्यायमूर्तींना भावना अनावर

हरीश राणा इच्छामरणाचा खटला देशभर चर्चेचा विषय बनला होता, ज्यामुळे सन्मानाने मरण्याचा अधिकार असे महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले होते. बुधवारी निकाल वाचताना न्यायमूर्ती पार्डीवाला म्हणाले की हरीश राणा शिक्षणात हुशार विद्यार्थी होता, परंतु एका अपघाताने त्याचे आयुष्य बदलले. या प्रकरणाची परिस्थिती सांगताना न्यायमूर्ती पार्डीवाला भावनिक झाले आणि त्यांचा आवाज काही काळासाठी भावूक झाल्याचे दिसले.

हरीश प्रतिसाद देत नाही

खंडपीठाने आपल्या निकालात पुढे म्हटले आहे की अशा प्रकरणांमध्ये रुग्णासाठी मृत्यू सोयीचा आहे की नाही, हा प्रश्न नसतो; तर जीवन देणारे उपचार रुग्णाच्या हिताचे आहेत का हा प्रश्न असतो. न्यायालयाने नमूद केले की हरीश राणा केवळ झोप आणि जाग एवढ्याच चक्रात अडकला आहेत. तो इतर कुठल्या गोष्टीला अर्थपूर्ण प्रतिसाद देऊ शकत नाहीत. तो त्याच्या दैनंदिन कामांसाठी पूर्णपणे इतरांवर अवलंबून आहे. न्यायालयाने असेही नमूद केले की हरीशला पीईजी ट्यूबद्वारे क्लिनिकली एडमिनिस्टर्ड न्यूट्रिशन (CAN) मिळत आहे आणि गेल्या काही वर्षांत त्याची प्रकृती अजिबात सुधारलेली नाही.

हरीश राणाला काय झाले होते?

२० ऑगस्ट २०१३ रोजी हरीश राणा चौथ्या मजल्यावरून पडला. यामुळे डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि एका दशकाहून अधिक काळ तो कोमात आहे. यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने नवी दिल्लीतील एम्सच्या दुय्यम वैद्यकीय मंडळाने सादर केलेल्या राणाच्या वैद्यकीय अहवालाची तपासणी केली होती आणि अहवाल 'दुःखद' असल्याचे म्हणत त्याच्या इच्छामरणाला परवानगी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Supreme Court Grants Passive Euthanasia, Judge Moved to Tears

Web Summary : The Supreme Court allowed passive euthanasia for Harish Rana, in a landmark decision. Justice Pardiwala became emotional, tears welling up while delivering the verdict. Rana, in a coma for 13 years after an accident, was deemed unable to meaningfully respond, prompting the court's compassionate ruling.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय