शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

इच्छामरणाला परवानगी मिळाली, आता पुढची तयारी सुरू; डॉक्टरही भावूक, 'अशी' पार पडणार प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 12:21 IST

सुप्रीम कोर्टाने त्यांच्या आदेशात स्पष्टपणे हे प्रकरण कुठल्याही प्रकारे सक्रीय इच्छामरण मानले जाऊ नये असं म्हटलं आहे.

नवी दिल्ली - गेल्या कित्येक वर्षापासून असहाय वेदना आणि गंभीर आजाराशी झुंज देत असलेल्या हरीश राणा यांच्या इच्छामरणाला सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली आहे. पहिल्यांदाच असा निर्णय घेताना कोर्टाच्या न्यायाधीशांनाही रडू आवरले नाही. हरीश राणाला इच्छामरणाची परवानगी दिल्यानंतर आता डॉक्टरांची टीम आवश्यक उपचार आणि प्रक्रियेसाठी त्याला AIIMS रुग्णालयात नेण्याची तयारी करत आहे. कुटुंब आणि डॉक्टर यांच्यासाठी हा वेदनादायी प्रसंग आहे. पुढच्या काळात मेडिकल प्रोटोकॉलसह हरीश राणाच्या इच्छामरणाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

एम्सच्या डॉक्टरांची टीम हरीश राणा याला संध्याकाळी देखरेखीत घरातून हॉस्पिटलला नेईल. जिथे पुढील उपचारासाठी त्याला भरती केले जाणार आहे. सर्व प्रक्रिया मेडिकल प्रोटोकॉल आणि कायद्यानुसार आखून दिलेल्या निर्देशात पार पाडली जाईल. जेणेकरून यात कुठलीही चूक होऊ नये. याबाबत एम्स प्रशासनाकडून अधिकृतपणे कुठलेही निवेदन आले नाही. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात असल्याने त्यांच्या देखरेखीखालीच प्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे सार्वजनिकपणे यावर कुणीही टिप्पणी करण्यास पुढे आले नाही.

सुप्रीम कोर्टाने त्यांच्या आदेशात स्पष्टपणे हे प्रकरण कुठल्याही प्रकारे सक्रीय इच्छामरण मानले जाऊ नये असं म्हटलं आहे. सक्रीय इच्छामरण म्हणजे कुठल्याही व्यक्तीला जीवन संपवण्यासाठी घातक इंजेक्शन देणे, हरीश राणाच्या प्रकरणात असे काही केले जाणार नाही. सध्या हरीश राणाला पीईजी ट्यूबच्या माध्यमातून लाईफ सपोर्ट दिला जात आहे. तो हळू हळू बंद केला जाईल. जेणेकरून कुठल्याही अतिरिक्त हस्तक्षेपाशिवाय नैसर्गिकरित्या पुढील काम होईल. सुप्रीम कोर्टाने हरीश राणाला निष्क्रिय इच्छामरणाची परवानगी दिली आहे. 

निष्क्रिय इच्छामरण काय असते?

निष्क्रिय इच्छामरण हे असे पाऊल आहे ज्यात कुठल्याही रुग्णाला देण्यात आलेला लाईफ सपोर्ट हटवला जातो. रुग्णाला जिवंत राहण्यासाठी दिले जाणारे आवश्यक उपचार थांबवून त्याला नैसर्गिक मृत्यू दिला जातो. लाईफ सपोर्टमध्ये व्हेटिंलेटर, अन्न पुरवणारी नळी बंद करणे यांचा समावेश असतो. त्यातून रुग्णाचा नैसर्गिक मृत्यू होतो. रुग्णाला वेदना विरहित मरण यावे यासाठी त्याची काळजी घेतली जाते. भारतात अशारितीने एखाद्याला इच्छामरण दिले जाते परंतु इतर देशात कठोर उपाय केले जातात. त्यात रुग्णाला घातक इंजेक्शन किंवा औषध दिले जाते. भारतात केवळ निष्क्रिय इच्छामरणाला काही अटींसह २०१८ मध्ये कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Supreme Court Allows Passive Euthanasia; Emotional Doctors Prepare for Procedure

Web Summary : Supreme Court permitted Harish Rana passive euthanasia. Doctors prepare to move him to AIIMS, following medical protocols to remove life support. This involves gradually ceasing the PEG tube, allowing natural death under court supervision. Passive euthanasia, legal in India since 2018, involves removing life support for a natural, painless death.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय