हरिहरनगरात देहव्यापाराचा अड्डा
By Admin | Updated: August 10, 2015 23:28 IST2015-08-10T23:28:23+5:302015-08-10T23:28:23+5:30
हरिहरनगरात देहव्यापाराचा अड्डा

हरिहरनगरात देहव्यापाराचा अड्डा
ह िहरनगरात देहव्यापाराचा अड्डा नागपूर : गुन्हे शाखा पोलिसांनी सोमवारी धाड टाकून हरिहरनगर येथील पॉश परिसरात सुरू असलेला देहव्यापाराचा अड्डा उघडकीस आणला. सोनेगाव हद्दीतील हरिहरनगर शांती हाईट बी विंगच्या सहाव्या माळ्यावरील फ्लॅट नंबर ६०६ येथे प्रमिला नावाची महिला व फिरोज खान नावाचा इसम हे दोघे देहव्यापाराचा अड्डा चालवीत असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सोमवारी सापळा रचला. गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त एस.के. तरवडे, पोलीस उपायुक्त दीपाली मासिरकर, सहायक पोलीस आयुक्त नीलेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बी.एम. पोवार, योगेश चौधरी, पोलीस हवालदार पांडुरंग निकुरे, प्रकाश सिडाम, संजय पांडे, योगेश घोडकी, प्रफुल बोंदरे, अस्मिता मेश्राम, अनिता धुर्वे, सामाजिक कार्यकर्त्या संध्या पवार यांनी घटनास्थळी धाड टाकली. यावेळी आरोपी प्रमिला कोहोड (४८) रा. गोळीबार चौक व फिरोज खान वल्द तुर्रेबाज खान (४३) रा. श्रावणनगर वाठोडा लेआऊट यांना अटक केली. हे दोघेेही मुलींना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेत होते. यावेळी त्यांच्या तावडीतून दोन मुलींची सुटका करण्यात आली. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.