पाणी वापराचा गांभीर्याने विचार व्हावा हरिभाऊ बागडे
By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:25+5:302015-01-23T23:06:25+5:30
पुणे : पाणी मुबलक उपलब्ध असूनही वापर वाढल्यामुळे टंचाई निर्माण होवू लागली आहे. त्यामुळे अनेक प्रश्न समोर उभे ठाकले आहेत. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन होणे आवश्यक आहे. यापार्श्वभुमीवर पाणी जमीनीत अधिक जिरविण्यासाठी व पाणी वापरासंदर्भात गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे मत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केले.

पाणी वापराचा गांभीर्याने विचार व्हावा हरिभाऊ बागडे
प णे : पाणी मुबलक उपलब्ध असूनही वापर वाढल्यामुळे टंचाई निर्माण होवू लागली आहे. त्यामुळे अनेक प्रश्न समोर उभे ठाकले आहेत. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन होणे आवश्यक आहे. यापार्श्वभुमीवर पाणी जमीनीत अधिक जिरविण्यासाठी व पाणी वापरासंदर्भात गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे मत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केले.किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पर्यावरण अभ्यासक क्रीश्नेंदू बोस, किर्लोस्करचे अतुल किर्लोस्कर, आरती किर्लोस्कर उपस्थित होते. पर्यावरणविषयात नाविन्यपूर्ण काम केल्याबद्ल पिंपरी चिंचवडचे हणमंतराव गायकवाड, कोलकत्याचे ध्रितीमान मुखर्जी, दिलीप खातू, विद्या अत्रेया, डॉ. भरत भूषण, पत्रकार अभिजित घोरपडे, सुरेश खानापूरकर यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. बागडे म्हणाले, पाण्याचा वापर वाढला असल्याने पाणी जपून वापरणे आवश्यक आहे. मोठमोठ्या हॉटेलमध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय केला जातो, त्याचा विचार होणे आवश्यक आहे. पाण्याची उपलब्धता अधिकाधिक निर्माण करणे हे आता सर्वात मोठे आव्हान आहे. पाण्याचे मोठे संकट निवारण होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. तापमान वाढल्याने निसगार्चे चित्र बदलले आहे. त्यासाठी नवनवे प्रयोग करायला हवेत. भूगर्भाचा अभ्यास करून पाण्याचे स्त्रोतावर विचार होण्याची गरज आहे. येत्या उन्हाळ्यात पाण्याची भीषण टंचाई जाणवणार असल्याची आताच दिसत आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून अभ्यासपूर्ण व कौशल्यपूर्ण तांत्रिकदृष्ट्या उपाययोजना करण्याची गरज आहे, असे खानापुरकर यांनी सांगितले. -----------