वाराणसी येथे होडी उलटली, १८ जण बेपत्ता
By Admin | Updated: August 5, 2014 21:57 IST2014-08-05T21:41:51+5:302014-08-05T21:57:05+5:30
वाराणसी येथे ४० लोकांना वाहून नेणारी होडी उलटली.या होडीतील २२ जणांना वाचवण्यात यश आलं असून १८ जण अजूनही बेपत्ता आहेत.

वाराणसी येथे होडी उलटली, १८ जण बेपत्ता
ऑनलाइन टीम
वाराणसी, दि. ५ - वाराणसी येथे ४० लोकांना वाहून नेणारी होडी उलटली. या होडीतील २२ जणांना वाचवण्यात यश आलं असून १८ जण अजूनही बेपत्ता आहेत. या होडीमध्ये काही जणांनी मोटर सायकल घेऊनजात असल्याने ऑव्हरलोडिंग होऊन गंगा नदीजवळच्या बेटवार घाट येथे ही दुर्घटना घडली असल्याचं येथील जिल्हाधिकारी प्रांजल यादव यांनी म्हटलं आहे. बेपत्ता व्यक्तींच्या कुटुंबियांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दोनलाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. हे सर्व प्रवासी मिर्झापूर येथील असून रोहनिया येथून ५० किलोमिटर लांब असणा-या गंगापूर येथे जात होते. हे यात्री एका मंदिरातून दर्शन घेऊन जात होते. मिर्झापूरच्या जिल्हाधिका-यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिक तपशिलवार माहिती घेतली. तसेच या प्रकरणी चौकशीकरता एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे.