बिहारमध्ये रॅगिंगमुळे हैराण ५० विद्यार्थी शाळेतून पळाले
By Admin | Updated: February 14, 2015 23:50 IST2015-02-14T23:50:10+5:302015-02-14T23:50:10+5:30
बिहारमध्ये रॅगिंगमुळे हैराण

बिहारमध्ये रॅगिंगमुळे हैराण ५० विद्यार्थी शाळेतून पळाले
ब हारमध्ये रॅगिंगमुळे हैराण५० विद्यार्थी शाळेतून पळालेशेखपुरा : कॉलेजचे विद्यार्थी सतत रॅगिंग करीत असल्याने येथील नवोदय विद्यालयाच्या ५० विद्यार्थ्यांनी शुक्रवारी रात्री शाळेतून धूम ठोकली. पळालेले सर्व विद्यार्थी आठवीचे आहेत. या विद्यार्थ्यांनी शनिवारी सकाळी जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन कैफियत मांडली. त्यानंतर हे प्रकरण उजेडात आले. जिल्हाधिकारी प्रणवकुमार यांनी शनिवारी सांगितले की, अकरावीच्या विद्यार्थ्यांकडून रॅगिंग होत असल्याने हे विद्यार्थी जेरीस आले होते. तक्रारीनंतरही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे रात्रीच्या भोजनानंतर हे विद्यार्थी वसतिगृहातून पळून गेले. शनिवारी सकाळच्या प्रार्थनेला आठवीचे विद्यार्थी नसल्याचे आढळून आले. त्यानंतर प्राचार्यांनी त्यांचा शोध घेतला. तेव्हा ते पळून गेल्याचे समोर आले. विद्यालयातून रात्री पळून गेलेले विद्यार्थी सकाळी जिल्हाधिकार्यांच्या निवासस्थानी गोळा झाले. तेव्हा परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकार्यांनी प्राचार्यांना पाचारण करीत या प्रकरणाची चौकशी करण्याचे तसेच सहभागी विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलविण्यास सांगितले. त्यानंतर या विद्यार्थ्यांना शाळेत परत पाठविण्यात आले व पुन्हा असा प्रकार होणार नाही याची खबरदारी घेण्याची सक्त ताकीद प्राचार्यांना देण्यात आली. शेखपुरा नवोदय विद्यालयाच्या वसतिगृहात ५०० विद्यार्थी राहतात. विद्यार्थी शाळेतून गायब झाल्यामुळे प्रशासन हादरून गेले होते.