शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या पूर्वसंध्येला हार्दिक पटेलला धक्का, अजून एका सहकाऱ्याने सोडली साथ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 17:39 IST

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या पूर्वसंध्येला पाटीदार अमानत आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याला धक्का बसला आहे.

अहमदाबाद -  गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या पूर्वसंध्येला पाटीदार अमानत आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याला धक्का बसला आहे. ऐन मतदानाच्या आधी हार्दिक पटेलचे निकटवर्तीया आणि पाटीदाप अमानत आंदोलन समितीचे मोठे नेते दिनेश बांभनिया यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेसने पाटीदार आरक्षणाचा मुद्दा आपल्या जाहीरनाम्यात घेतलेला नाही. त्यामुळे पाटीदार आरक्षणाचा विषय मागे पडला आहे असा आरोप त्यांनी राजीनामा देताना केला आहे. तसेच सीडी कांड प्रकरणी त्यांनी हार्दिक पटेलबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.  यंदाच्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सत्ताधारी भाजपा आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसपेक्षा हार्दिक पटेलची पाटीदार अमानत आंदोलन समितीच अधिक चर्चेत आहे. तसेच पटेलांच्या नाराजीचा मतदानामध्ये प्रभाव दिसण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. पण मतदान तोंडावर आले असताना पाटीदारांच्या समितीमध्ये फूट पडताना दिसत आहे. बांभनिया यांनी याआधी हार्दिक पटेलच्या रणनीतीवर टीका केली होती. तसेच तिकीट वाटपावरून काँग्रेसला विरोधही केला होता. काँग्रेसने पाटीदार अमानत आंदोलन समितीला विश्वासात न घेता समितीच्या सदस्यांना तिकीट दिल्यासा आक्षेप त्यांनी घेतला होता.  2015 साली आयोजित करण्यात आलेल्या महारॅली नंतर पाटीदारांची कोअर कमिटी चर्चेत आली होती. मात्र कालांतरात त्यातील बऱ्याच सदस्यांनी या समितीची साथ सोडली आहे. या संपूर्ण संघर्षात केवळ एक चेहरा बदललेला नाही तो म्हणजे हार्दिक पटेल. बांभनिया यांच्यापूर्वी केतन पटेल, चिराग पटेल, वरुण पटेल आणि रेश्मा पटेल यांनी हार्दिक पटेलची साथ सोडली आहे.  

टॅग्स :hardik patelहार्दिक पटेलGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017