शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

'... त्यांना माझे मनोधैर्य तोडायचे आहे', भाजपमध्ये सामील होण्याच्या चर्चेदरम्यान हार्दिक पटेल यांचं ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 16:23 IST

Hardik Patel : गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याआधी काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी चर्चा सुरू आहे.

नवी दिल्ली : साधारणपणे प्रत्येक राज्याच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेत्यांनी पक्ष सोडल्याच्या बातम्या समोर येऊ लागतात. गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याआधी काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी चर्चा सुरू आहे.  मात्र, तीन वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या हार्दिक पटेलने या चर्चांना पूर्णविराम देत सध्या काँग्रेसमध्ये असल्याचे म्हटले आहे.

हार्दिक पटेल यांनी ट्विट केले आहे की, "मी सध्या काँग्रेसमध्ये आहे. मला आशा आहे की, केंद्रीय नेते काहीतरी मार्ग काढतील, ज्यामुळे मी काँग्रेसमध्ये राहू शकेन. असे काही आहेत, ज्यांना हार्दिकने काँग्रेस सोडावी अशी इच्छा आहे. त्यांना माझे मनोधैर्य तोडायचे आहे." दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पटेल हे काँग्रेसवर नाराज असल्याचे दिसून येत आहे.

व्हॉट्सअॅप बायोमधून काँग्रेस हटवले पाटीदार नेता हार्दिक पटेल यांनी दिल्लीत भाजपच्या एका मोठ्या नेत्याची भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्यांनी याबाबत काहीही सांगितलेले नाही. तसेच, हार्दिक पटेल यांनी व्हॉट्सअॅपवरील डीपीही बदलला आहे. त्यांनी आपल्या व्हॉट्सअॅप बायोमधून काँग्रेस सुद्धा हटवले आहे. व्हॉट्सअॅपवरील नवीन डीपीमध्ये हार्दिक पटेल यांनी गळ्यात भगवा गमछा घातलेला दिसत असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा स्थितीत ते भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काही दिवसांपूर्वी काँग्रेसवर टीका पाटीदार आरक्षण आंदोलनाचा नेता असलेल्या हार्दिक पटेल यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसवर टीका केली होती आणि पक्षाच्या नेतृत्वावरही प्रश्न उपस्थित केले होते. त्याचबरोबर, ते सातत्याने भाजपचे कौतुक करत आहेत. अशा स्थितीत भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा सुरू झाली आहे. आता भाजपच्या नेत्याच्या भेटीनंतर ते पक्षप्रवेश करण्याची जोरदार शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :hardik patelहार्दिक पटेलcongressकाँग्रेसGujaratगुजरात