शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बेमुदत उपोषणास बसलेला हार्दिक पटेल रुग्णालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 06:53 IST2018-09-09T06:53:04+5:302018-09-09T06:53:19+5:30
पाटीदार समाजास आरक्षण व शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बेमुदत उपोषणास बसलेल्या हार्दिक पटेल यांची १४व्या दिवशी, शुक्रवारी प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बेमुदत उपोषणास बसलेला हार्दिक पटेल रुग्णालयात
अहमदाबाद : पाटीदार समाजास आरक्षण व शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बेमुदत उपोषणास बसलेल्या हार्दिक पटेल यांची १४व्या दिवशी, शुक्रवारी प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. हार्दिक यांचे वजन खूपच घटले असून, त्यांनी तीन दिवसांपासून पाणी पिणेही थांबविले होते. मात्र, शनिवारी दुपारी समाजवादी नेते शरद यादव यांनी हार्दिक यांची भेट घेतली आणि त्यांची समजूत घालून त्यांना पाणी पाजले. (वृत्तसंस्था)