नवी दिल्ली : जागतिक दर्जाची रेल्वेसेवा हवी की बकाल रेल्वेसेवा हवी? हे जनतेला ठरवावे लागेल, असे सांगत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सरकारद्वारे केलेल्या रेल्वे भाडेवाढीचे जोरदार समर्थन केले आह़े रेल्वे भाडेवाढ हा कठोर पण योग्य निर्णय असल्याचेही ते म्हणाल़े
शनिवारी रेल्वे भाडेवाढीविरुद्ध विरोधी पक्षांनी देशभर निदर्शने चालवली असताना, जेटलींनी आपल्या फेसबुक अकाउंटवर ‘रेल्वे भाडेवाढीमागचे सत्य’ या शीर्षकाखाली सरकारची भूमिका मांडली आह़े प्रवासी त्यांना मिळालेल्या सुविधेसाठी पैसे मोजणार असतील तरच रेल्वेचे अस्तित्व शाबूत राहील़ रेल्वेची वित्तीय स्थिती खूप नाजूक असून दररोज 3क् कोटी रुपयांचा घाटा सोसावा लागत आहे. अशा स्थितीत सरकारजवळ केवळ दोनच पर्याय होत़े एकतर रेल्वेला आहे त्या स्थितीत सोडून कर्जाच्या जंजाळात फसू देणो किंवा भाडेवाढ करणो़ भाडेवाढ हा योग्य पर्याय सरकारने स्वीकारला़ आपली सत्ता जाणार हे स्पष्ट झाल्यावर संपुआ सरकारने काही तासांतच हा निर्णय स्थगित ठेवला, याकडेही जेटलींनी लक्ष वेधल़े आधीच्या संपुआ सरकारची चुकीची धोरणो बदलून टाकू, असे वचन देऊन भाजपा सत्तेत आली होती़ पण ताजी रेल्वे भाडेवाढ बघता, हे सरकारही जुन्या सरकारचाच कित्ता गिरवताना दिसत आह़े, असे द्रमुक प्रमुख एम करुणानिधी म्हणाले. (प्रतिनिधी)
काँग्रेसने दंड थोपटले
रेल्वे भाडेवाढीविरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही दंड थोपटत शक्तिप्रदर्शन केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा चित्र वाघ यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी दुपारी छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे निदर्शने केली. भाजपाचे खासदार किरीट सोमय्या आता कुठे गेले? असा टोलाही वाघ यांनी सोमय्या यांना लगावला. काँग्रेसचे नगरसेवक प्रवीण छेडा यांनीदेखील घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळ निदर्शने केली. काँग्रेसचे आमदार कृष्णा हेगडे यांनीदेखील विलेपार्ले रेल्वे स्थानकावर निषेध केला.