हर... हर... महादेवच्या जयघोषाने नवी मुंबई दुमदुमली
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:34+5:302015-02-18T00:13:34+5:30
नवी मुंबई : हर... हर... महादेव..., बम बम भोले..., ओम नम: शिवायच्या जयघोषात भक्तांनी शिवमंदिरात दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे मंदिरामध्ये आयोजन करण्यात आले होते.

हर... हर... महादेवच्या जयघोषाने नवी मुंबई दुमदुमली
न ी मुंबई : हर... हर... महादेव..., बम बम भोले..., ओम नम: शिवायच्या जयघोषात भक्तांनी शिवमंदिरात दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे मंदिरामध्ये आयोजन करण्यात आले होते.नवी मुंबईत सर्व शिवमंदिरांमध्ये आज पहाटे ४ वाजल्यापासून भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या. पंचामृतांनी अभिषेक करण्यात आला. भक्तांनी बेल, पांढर्या रंगाची फुले वाहून पूजा केली. मंदिरामध्ये हरिपाठ, भजन, कीर्तन इत्यादी धार्मिक कार्यक्रमांमुळे सर्व नवी मुंबई परिसर भक्तिमय वातावरणामध्ये न्हाऊन निघाला होता. शहरामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठिकठिकाणी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. वाशी येथील पुरातन जागृतेश्वर मंदिरामध्ये संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत हरिपाठाचे आयोजन केले होते. मोठ्या संख्येने भक्त उपस्थित होते. सानपाडा येथील दत्तमंदिरातील शिवमंदिरामध्येही हरिपाठ व भजनाचा कार्यक्रम पार पडला. पावणे येथील पावणेश्वर शिवमंदिरामध्ये हरिभक्तांच्यावतीने कीर्तन, हरिपाठ व भजन करण्यात आले. त्याचबरोबर एमजीएम कॉलनीतील शिवमंदिर, पामबीच येथील बुद्धेश्वर शिवमंदिर, महापे-एमआयडीसीमधील बावखळेश्वर शिवमंदिर, कोपरखैरणे येथील चिकणेश्वर शिवमंदिर, बेलापूर गावातील शिवमंदिर, घणसोली गावातील शिवमंदिर, नेरूळ गावातील सेक्टर-१६-१८ तलावाजवळील शिवमंदिर, खारघर सेक्टर-१२ येथील शिवमंदिर व खांदेश्वर येथील शिवमंदिरात पहाटेपासून रुद्राभिषेक, महाआरती, शिवपूजा करण्यात आली. (प्रतिनिधी)चौकटशिवभक्तांसाठी महाप्रसादपहाटे ४ वाजल्यापासून दर्शनासाठी येणार्या भक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी मंदिराच्या परिसरामध्ये मंडप उभारण्यात आला होता. आसन व्यवस्था आणि रांगा तयार केल्या होत्या. सर्व शिवमंदिरांमध्ये महाप्रसादाचे आयोजन केले होते, त्याचबरोबर अनेक शिवभक्त, समाजसेवक आणि राजकीय पक्षांच्यावतीने महाशिवरात्रीनिमित्त अन्नदान, फराळाचे वाटप करण्यात आले. शिवाचे नामस्मरण करणार्या भक्तांसाठी खास आसन व्यवस्था मंदिर परिसरामध्ये करण्यात आली होती. फोटो आहेत- महाशिवरात्री