#HappyBirthdayDada - सौरभ गांगुलीवर झाला शुभेच्छांचा वर्षाव

By Admin | Updated: July 8, 2017 13:40 IST2017-07-08T13:40:19+5:302017-07-08T13:40:54+5:30

भारताचा माजी कप्तान सौरभ गांगुलीने आज पंचेशाळिशी पार केली. भारताच्या सर्वाधिक यशस्वी कर्णधारांपैकी एक, शैलीदार डावखुरा फलंदाज, आक्रमक टीममेट

#HappyBirthdayDada - Saurav Ganguly has been a happy year | #HappyBirthdayDada - सौरभ गांगुलीवर झाला शुभेच्छांचा वर्षाव

#HappyBirthdayDada - सौरभ गांगुलीवर झाला शुभेच्छांचा वर्षाव

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 - भारताचा माजी कप्तान सौरभ गांगुलीने आज पंचेशाळिशी पार केली. भारताच्या सर्वाधिक यशस्वी कर्णधारांपैकी एक, शैलीदार डावखुरा फलंदाज, आक्रमक टीममेट आणि प्रतिस्पर्ध्यांच्या शिवीगाळीला न दबता अरे ला का रे करण्याची वृत्त यामुळे सौरभची कारकिर्द गाजली. दादा या नावानं परिचित असलेल्या गांगुलीनं 1996मध्ये इंग्लंडमध्ये क्रिकेटच्या पंढरीत लॉर्ड्सवर पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात शतक झळकावत गांगुलीनं येणारा काळ आपला असेल असा विश्वास निर्माण केला.
भारतीय क्रिकेटवर मरगळ आलेली असताना तिला उभारी देण्याचं काम गांगुलीनं केलं. काही मालिका किंवा चषक गमावले तरीही त्याच्या नेतृत्वगुणांचं कौतुकच झालं.  सौरभ गांगुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा... तसंच ही झलक काय म्हणतात सेलिब्रिटी गांगुलीविषयी...

Web Title: #HappyBirthdayDada - Saurav Ganguly has been a happy year