पंतप्रधानांवर शुभेच्छांचा वर्षाव

By Admin | Updated: September 18, 2015 02:49 IST2015-09-18T02:49:03+5:302015-09-18T02:49:03+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुरुवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मोदी यांनी गुरुवारी वयाची ६५ वर्षे पूर्ण केली.

Happy Prime Minister | पंतप्रधानांवर शुभेच्छांचा वर्षाव

पंतप्रधानांवर शुभेच्छांचा वर्षाव

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुरुवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मोदी यांनी गुरुवारी वयाची ६५ वर्षे पूर्ण केली.
राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात पंतप्रधानांची कष्ट घेण्याची तयारी, उत्साह आदींचा गुणगौरव केला आहे. आपले कष्ट, उत्साह आणि इतरांपेक्षा वेगळा विचार करण्याची वृत्ती या गुणांची देश-विदेशात प्रशंसा झाली आहे. परमेश्वर आपल्याला चांगले आरोग्य, आनंद व दीर्घायुष्य देवो, असे राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे. राहुल गांधी, काँग्रेस नेते शशी थरूर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आदींनीही मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Web Title: Happy Prime Minister