VIDEO- खुनी मुलाला भेटून खूश आहात का ? पाक मीडियाचे जाधव कुटुंबीयांना उर्मट प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2017 11:50 AM2017-12-27T11:50:16+5:302017-12-27T12:16:10+5:30

Happy to meet the criminal child? Pakh Media's Kulbhushan Jadhav family's abusive question | VIDEO- खुनी मुलाला भेटून खूश आहात का ? पाक मीडियाचे जाधव कुटुंबीयांना उर्मट प्रश्न

VIDEO- खुनी मुलाला भेटून खूश आहात का ? पाक मीडियाचे जाधव कुटुंबीयांना उर्मट प्रश्न

googlenewsNext
ठळक मुद्देपाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव भेटीदरम्यान त्यांच्या पत्नी व आई यांना अपमानास्पद वागणूक दिली.पाकिस्तानी माध्यमांनी कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांना अपमानास्पद प्रश्न विचारल्याची माहिती समोर आली आहे.

इस्लामाबाद-  पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव भेटीदरम्यान त्यांच्या पत्नी व आई यांना अपमानास्पद वागणूक दिली.  कुलभूषण जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भेटीदरम्यान पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तानी माध्यमांनी कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांना अपमानास्पद प्रश्न विचारल्याची माहिती समोर आली आहे. कुलभूषण जाधव यांच्या भेटीनंतर पाकिस्तानी माध्यमांनी कुलभूषण यांच्या आई आणि पत्नीला अपमानास्पद प्रश्न विचारले.

कुलभूषण जाधव यांची आई व पत्नी कुलभूषण यांची भेट घेतल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचे बाहेर थांबले होते. याचदरम्यान, पाकिस्तानी माध्यमांनी त्यांना अपमास्पद प्रश्न विचारले. गुन्हेगार मुलाला भेटून आनंद झाला का? (अपने कातील बेटे से मिलने के बाद आपके क्या जजबात हैं? ) तुमच्या पतीने हजारो निष्पाप पाकिस्तांनी लोकांच्या रक्ताने होळी खेळली आहे, याबद्दल काय सांगालं? (आपके पतिदेव ने हजारों बेगुनाह पाकिस्तानियों के खून से होली खेली है, इसके बारे में क्या कहती हैं आप?' ), असे प्रश्न पाकिस्तानच्या माध्यमांनी विचारले. 



 

इस्लामाबादमध्ये  पाक उच्चायुक्तालयाच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या शिपिंग कंटेनरमध्ये जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांची काचेच्या भिंतीआडून भेट झाली होती. त्यानंतर जाधव यांच्या पत्नी आणि आई शिपिंग कंटेनरमधून बाहेर पडताच पाकिस्तानी मीडियानं त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. पाकिस्तानी पत्रकार त्यांना ओरडून ओरडून प्रश्न विचारत होते. 'या भेटीवर समाधानी आहात का? तुमच्या पतीने हजारो पाकिस्तानी नागरिकांना ठार मारलं, त्यावर तुमचं काय मत आहे?,' असे प्रश्न पाकिस्तानी पत्रकारांनी जाधव यांच्या पत्नीला केले. जाधव यांच्या आईलाही असेच अपमानास्पद प्रश्न विचारण्यात आले. त्यामुळे त्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता त्या निघून गेल्या. 

कुलभूषणच्या आई, पत्नीला काढायला लावले मंगळसूत्र, बांगड्या अन् टिकलीही
कुलभूषण यांची आई अवंती व पत्नी चेतनकुल यांनी इस्लामाबादहून परत आल्यानंतर मंगळवारी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली. यावेळी सुरक्षेच्या नावाखाली या दोघींच्या सांस्कृतिक व धार्मिक भावनांचा अनादर केला गेला. यात त्यांना मंगळसूत्र, बांगड्या व कपाळावरील टिकलीही काढून ठेवायला लावली व सुरक्षेच्या दृष्टीने गरजचे नसूनही पेहराव बदलायला लावला. जाधव यांच्या आईची मातृभाषा मराठी असल्याने त्यांनी मुलाशी त्या भाषेत बोलणे स्वाभाविक होते. परंतु त्या मराठीत बोलू लागल्यावर वारंवार त्यांना थांबविले गेले व शेवटी मराठी बोलणे बंद करायला लावले गेले.

पत्नी अनवाणी परतली
भेटीच्या खोलीत जाण्याआधी जाधव यांच्या पत्नी व आईला त्यांची पादत्राणे बाहेर काढून ठेवायला सांगितले गेले. मात्र भेटीनंतर, वारंवार विनंती करूनही जाधव यांच्या पत्नीला त्यांचे बूट परत दिले गेले नाहीत. असे का केले गेले हे अनाकलनीय आहे.

Web Title: Happy to meet the criminal child? Pakh Media's Kulbhushan Jadhav family's abusive question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.