महाशिवरात्र देशभर साजरी पंतप्रधानांच्या शुभेच्छा
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:03+5:302015-02-18T00:13:03+5:30
नवी दिल्ली : देशात सर्वत्र मंगळवारी महाशिवरात्र उत्साहात साजरी झाली़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिष्ट्वटरवरून देशवासीयांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या़

महाशिवरात्र देशभर साजरी पंतप्रधानांच्या शुभेच्छा
न ी दिल्ली : देशात सर्वत्र मंगळवारी महाशिवरात्र उत्साहात साजरी झाली़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिष्ट्वटरवरून देशवासीयांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या़ पंजाब, हरियाणा, केरळ, राजस्थान अशा अनेक राज्यांत महाशिवरात्र साजरी झाली़ भगवान शिवशंकराच्या उपासनेचा दिवस म्हणून ओळखल्या जाणार्या महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी विविध शिवमंदिरात जाऊन शिवअर्चना केली़ राजस्थानात मेवाडचे आराध्यदैवत असलेल्या भगवान एकलिंगजी येथे शिवभक्तांची गर्दी उसळली़ (लोकमत न्यूज नेटवर्क)