शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

LAC वर साडेचार वर्षांनंतर Happy Diwali, भारत आजपासून गस्त घालणार, मिठाई वाटली जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 10:14 IST

India China News: मागच्या जवळपास साडेचार वर्षांपासून भारत आणि चीनमध्ये असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर असलेला तणाव अखेर निवळला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर यावर्षी बऱ्याच काळानंतर दिवाळीचं आनंदी वातावरण आहे.

मागच्या जवळपास साडेचार वर्षांपासून भारत आणि चीनमध्ये असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर असलेला तणाव अखेर निवळला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर यावर्षी बऱ्याच काळानंतर दिवाळीचं आनंदी वातावरण आहे. तसेच मागच्या साडे चार वर्षांपासून ज्या भागात तणावामुळे गस्त घालता येत नव्हती, अशा ठिकाणी आजपासून भारतीय लष्कर गस्त घालणार आहे. तसेच दिवाळी निमित्त भारत-चीन सीमेवरील सर्वांचं तोंड आज मिठाई भरवून गोड केलं जाणार आहे. एप्रिल २०२० पासून सुमारे साडेचार वर्षे राहिलेल्या तणावपूर्ण परिस्थितीनंतर भारत आणि चीनमध्ये देपसांग आणि डेमचोक परिसराचं निर्लष्करीकरण करणं आणि गस्त घालण्याबाबत एकमत झालं आहे.

पूर्व लडाखमधील देपसांग आणि डेमचोक परिसरामध्ये मागच्या साडेचार वर्षांपासून गस्त बंद होती. सीमेवरील तणावामुळे चिनी सैन्याने भारतीय लष्कराची गस्तीची वाट अडवली होती. मात्र मागच्या काही दिवसांत घडलेल्या घडामोडींनंतर दोन्ही देशांमधील तणाव बऱ्यापैकी निवळला असून, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पूर्वपार स्थितीत जाण्याबाबत दोन्ही देशांमध्ये एकमत झालं आले. त्यानंतर आजपासून भारतीय लष्कर या भागात गस्त घालण्यास सुरुवात करणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खराब हवामानामुळे डेमचोक परिसरामध्ये मंगळवारी व्हेरिफिकेशनचं काम होऊ शकलेलं नाही. मात्र बुधवारी एरियल व्हेरिफिकेशन करण्यात आलं. भारत आणि चीनचे ग्राऊंड कमांडर देपसांगमध्ये दोन आणि डेमचोकमध्ये एका ठिकाणी भेटले. तसेच दोन्ही बाजूंनी डिसएंगेजमेंटची पडताळणी करण्यात आली. डेमचोक आणि देपसांग येथे उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या चौक्या आणि तंबू हटवण्यात आल्यानंतर दोन्हीकडचे सैनिक एप्रिल २०२० पूर्वीच्या स्थितीत गेले आहेत. आता आज दिवाळीच्या निमित्ताने दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांना मिठाई देतील. भारत आणि चीनमध्ये असलेल्या ६ बॉर्डर पर्सनल मिटिंग पॉईंटवर ही मिठाईची देवाण घेवाण होणार आहे. मात्र असं असलं तरी भूतकाळात चिनी सैन्याने केलेला दगाफटका पाहता भारतीय लष्कर चिनी सैन्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवणार आहे.  

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावladakhलडाखIndian Armyभारतीय जवान