पवनपुत्र हनुमान यांनाच न्यायालयात हजर राहण्याची नोटीस
By Admin | Updated: February 16, 2016 23:05 IST2016-02-16T22:14:47+5:302016-02-16T23:05:09+5:30
बिहारमधील उपविभागीय दंडाधिकारी न्यायालयाने चक्क भगवान पवनपुत्र हनुमानला न्यायालयात हजर राहण्याची नोटीस पाठविली आहे.

पवनपुत्र हनुमान यांनाच न्यायालयात हजर राहण्याची नोटीस
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, १६ - बिहारमधील उपविभागीय दंडाधिकारी न्यायालयाने चक्क भगवान पवनपुत्र हनुमान यांनाच न्यायालयात हजर राहण्याची नोटीस पाठविली आहे.
बिहारमधील रोहतस जिल्ह्यातील देहरी येथे असलेल्या उपविभागीय दंडाधिकारी न्यायालयाने पवनपुत्र हनुमान यांना न्यायालयात हजर राहण्याची नोटीस पाठविली आहे. विशेष म्हणजे ज्या मंदिरात ही नोटीस पाठविली आहे. त्या मंदिरातील भगवान हनुमान यांच्या मूर्तीवर ही नोटीस लावण्यात आली आहे.