शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

छळाचा बदला घेण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये भटकतोय आत्मा?; कर्मचारी भीतीच्या छायेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 16:50 IST

या घटनेनंतर पोलीस ठाण्यात पोलिसांनी हनुमान चालिसा वाचन करण्यास सुरुवात केली आहे.

मेरठ - उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात एका पोलीस ठाण्यात अजब-गजब घटना उघडकीस आली आहे. आरोपींना सळो की पळो करुन सोडणारे पोलिसवाले येथील एका पोलीस स्टेशनमध्ये भूताच्या नावाखाली थरथर कापत आहेत. यूपीतल्या टीपीनगर पोलीस ठाण्यात असणाऱ्या कथित भूताच्या चर्चेने सर्वांमध्ये दहशतीचं वातावरण पसरवलं आहे. 

भूताच्या भीतीमुळे येथील ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी हनुमान चालिसा वाचन करण्यास सुरुवात केली आहे. सांगितलं जातं की, पोलिसांच्या छळामुळे आत्महत्या करणाऱ्या युवकाची आत्मा या ठाण्यात दिसते. मात्र पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला नाही. एका हिंदी वृत्तपत्राने छापलेल्या बातमीनुसार एका युवकाला काही दिवसांपूर्वी पोलिसांनी स्टेशनला आणलं होतं. त्यावेळी त्याने आत्महत्या केली. काही लोकांचे म्हणणं आहे की, पोलिसांनी या युवकाचा छळ केला होता. त्याचा बदला घेण्यासाठी या युवकाची आत्मा पोलीस ठाण्यात भटकत आहे. पोलिस सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे साधारणपणे एक आठवड्यापूर्वी रात्रीच्या वेळी काही पोलीस कर्मचाऱ्यांनी ठाण्यात भूत बघितल्याचा दावा केला आहे. 

या घटनेनंतर पोलीस ठाण्यात पोलिसांनी हनुमान चालिसा वाचन करण्यास सुरुवात केली आहे. पोलीस स्टेशनचे प्रभारी यांच्याकडून पूजेचं आयोजन केलं गेलं. इतकचं नाही तर पोलीस ठाण्यात हनुमानाची मूर्ती बसविण्यात येणार असल्याचंही माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. मात्र ठाण्याचे प्रभारी दिनेश चंद्र यांनी हा दावा फेटाळून लावत पोलीस ठाणे माझ्या घरासारखे आहे. त्यामुळेच मी पूजा केली आहे. भूत-प्रेतासारखी कोणतीही गोष्ट नाही असं ते म्हणाले. 

यापूर्वीही मुजफ्फरनगर येथील ककरौली पोलीस ठाण्यात असाच प्रकार समोर आला होता. या ठाण्यामध्ये एका दशकात सापांचा घेरा पडत होता. भूताची अफवाह पसरली होती. पोलीस ठाण्यामध्ये प्रवेश करताना घाबरत असतं. तेव्हा पोलीस कर्मचाऱ्यांनी ठाण्यामध्ये पूजेचं आयोजन केलं होतं.  

टॅग्स :PoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश