शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

केरळमध्ये HAMASची एन्ट्री, सेव्ह पॅलेस्टाईन रॅलीत हमासच्या नेत्याचं भाषण; भाजपनं केली कारवाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2023 17:14 IST

एका व्हिडिओमध्ये हमास या दहशतवादी संघटनेचा नेता खालिद माशेल लोकांना संबोधित करताना दिसत आहे.

गेल्या 7 ऑक्टोबरला इस्रायलवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या  हमासच्या एका नेत्याने शुक्रवारी केरळच्या मलप्पुरममध्ये सॉलिडेरिटी यूथ मूव्हमेंटने आयोजित केलेल्या एका रॅलीत भाग घेतला होता. सॉलिडेरिटी यूथ मूव्हमेंट ही जमात-ए-इस्लामीची युवा शाखा आहे. एका व्हिडिओमध्ये हमास या दहशतवादी संघटनेचा नेता खालिद माशेल लोकांना संबोधित करताना दिसत आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार, हमासचा दहशतवादी खालिद माशेलने या रॅलीला ऑनलाइन पद्धतीने संबोधित केले. माशेलच्या भाषणाचा भारतीय जनता पक्षाचे (भाजप) प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांनी निषेध केला आहे. त्यांनी केरळ पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, या कार्यक्रमातील माशेलच्या सहभागा विरोधात कारवाईचीही मागणी केली आहे.

सुरेंद्रन यांनी एक्सवर (ट्विटर) म्हटले आहे, "मलप्पुरममध्ये सॉलिडेरिटी कार्यक्रमात हमास नेता खालिद माशेलचे व्हर्च्युअल संबोधन हा चिंतेचा विषय आहे. पिनाराई विजयन यांचे केरळ पोलीस कुठे आहेत? 'सेव्ह पॅलेस्टाइन'च्या आडून, ते दहशतवादी संघटना हमास आणि त्यांच्या नेत्यांचा 'योद्धा' म्हणून गौरव करत आहेत. हे अस्वीकार्य आहे."

टॅग्स :KeralaकेरळIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षBJPभाजपा