हमाली दरात २३ टक्के वाढ
By Admin | Updated: January 27, 2016 23:15 IST2016-01-27T23:15:40+5:302016-01-27T23:15:40+5:30
जळगाव- बाजार समितीमध्ये कार्यरत हमालांच्या हमाली दरात २३ टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याची माहिती जिल्हा माथाडी व जनरल कामगार संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाद्वारे दिली आहे.

हमाली दरात २३ टक्के वाढ
ज गाव- बाजार समितीमध्ये कार्यरत हमालांच्या हमाली दरात २३ टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याची माहिती जिल्हा माथाडी व जनरल कामगार संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाद्वारे दिली आहे. हमाली दराबाबत दोन वर्षांनी करार केला जातो. त्याची मुदत संपली होती. ही बाब लक्षात घेता नवीन करार करणे गरजेचे होते. त्याबाबत बाजार समितीमधील व्यापारी असोसिएशन व संघटना यांच्यात दोनदा बैठक झाली. संघटनेने ४० टक्के भाववाढ मागितली होती. बाजार समितीचे पदाधिकारी व संघटना यांच्यासोबत झालेल्या बैठकीत २३ टक्के भाववाढीस मंजुरी देण्यात आली. बैठकीत संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉमेश सपकाळे, शरद चौधरी, पोपट सपकाळे, तुकाराम गर्जे, बन्सी खरात, सुकदेव शेळके, सुकदेव बादल, अण्णा यादव, मोहन सोनार, रतन सपकाळे, यमाजी चितळे, सुरेश बाविस्कर, गंगाराम फाळके, विष्णू पवने, हिलाल पाटील, महेंद्र वाणी, भाऊराव बाविस्कर, नथ्थू सोनार, शेषराव मंडलिक, अंबादास बोरूडे, विश्वनाथ बोरूडे, नाना सगळे आदी उपस्थित होते.