आधी पाकचा चायवाला; आता नेपाळी ‘तरकारीवाली’ व्हायरल!

By Admin | Updated: November 4, 2016 06:24 IST2016-11-04T06:24:33+5:302016-11-04T06:24:33+5:30

हल्ली सोशल मीडियावर काय व्हायरल होईल आणि लोकप्रिय होईल, हे सांगता येत नाही.

Half cup of tea; Nepali 'Tatariwali' viral now! | आधी पाकचा चायवाला; आता नेपाळी ‘तरकारीवाली’ व्हायरल!

आधी पाकचा चायवाला; आता नेपाळी ‘तरकारीवाली’ व्हायरल!


नवी दिल्ली- हल्ली सोशल मीडियावर काय व्हायरल होईल आणि लोकप्रिय होईल, हे सांगता येत नाही. सुमारे पंधरवड्यापूर्वी पाकिस्तानातील एका चहावाल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि लोकप्रियही. पूर्णपणे निळ्या डोळ्याच्या अर्शद खानने सर्वांचेच लक्ष काही काळ वेधून घेतले होते. मी राजबिंडा दिसतो, असे सारेच जण मला सांगत असायचे, पण तुम्ही गरीब असाल तर तुम्हाला चहा विकण्यासारखा लहानसहान व्यवसाय करावा लागतो, असे जेमतेम १८ वर्षांचा अर्शद खान तेव्हा म्हणाला होता, पण त्याचे छायाचित्र प्रसारित होताच, तो चक्क मॉडेलच बनला.
अर्शद खान विस्मृतीत जायच्या आत आता नेपाळमध्ये भाजी विक्री करणाऱ्या एका मुलीचे छायाचित्र सोशल मीडियावर सर्वत्र फिरू लागले आहे. अर्शद खानप्रमाणेच या मुलीला कोणीतरी पाहिले आणि तिचे छायाचित्र टिपून ते सोशल मीडियावर टाकले. बस्स... आता ती लोकप्रिय होताना दिसत आहे. तिचे नाव मुद्दाम जाहीर करण्यात आलेले नाही. भारताच्या जवळ असलेल्या चितवन भागात ती भाजी विकते आणि तिथेच जवळपास राहते. तरकारीवाली म्हणून तिचा हा फोटो व्हायरल होतो आहे.

Web Title: Half cup of tea; Nepali 'Tatariwali' viral now!