एचएएल रन फॉर ‘ुमिनिटी-२०१५

By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:18+5:302015-02-14T23:52:18+5:30

ओझर : एचएईडब्ल्यूआरसी नियंत्रित छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त युवा फाउण्डेशनतर्फे रविवारी (दि. १५) सकाळी ७ वाजता ओझर टाऊनशिप येथे रन फॉर ‘ुमिनिटी उपक्रम होत आहे, अशी माहिती युवा फाउण्डेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय कुटे यांनी दिली आहे.

HAL Run for Humanity-2015 | एचएएल रन फॉर ‘ुमिनिटी-२०१५

एचएएल रन फॉर ‘ुमिनिटी-२०१५

र : एचएईडब्ल्यूआरसी नियंत्रित छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त युवा फाउण्डेशनतर्फे रविवारी (दि. १५) सकाळी ७ वाजता ओझर टाऊनशिप येथे रन फॉर ‘ुमिनिटी उपक्रम होत आहे, अशी माहिती युवा फाउण्डेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय कुटे यांनी दिली आहे.
ओझर टाऊनशिप येथील ओपन एअर स्टेडियम येथून सकाळी हा रन सुरू होईल. चित्रपट अभिनेत्री मृणाल दुसानीस, भारत केसरी राहुल बोडके आणि आरजे भूषण मटकरी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाणार आहेत. ओपन एअर स्टेडियम येथून सुरू झालेला हा रन भाजी मार्केट, प्रगती म्युझियम, देवळाली स्टोअर्समार्गे पुन्हा ओपन एअर स्टेडियमकडे रवाना होईल. लहान मुले, महिला व पुरुष अशा तीन वेगवेगळ्या गटात हा रन होणार असून, रनचे हे सलग दुसरे वर्ष आहे. या रनमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन युवा फाउण्डेशनतर्फे प्रशांत सोनवणे, अविनाश भंडारे, श्रीकांत पगार, सचिन शिंदे, गिरीश पाटील, सुधीर राजगुरू, यजुवेन्द्र बरके, विशाल पवार, कमलेश बनकर, मिलिंद निकम, हेमंत गडवजे आणि सागर कदम आदिंनी केले आहे.
(वार्ताहर)

Web Title: HAL Run for Humanity-2015

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.