शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

हेअरस्टायलिस्ट जावेद हबीब स्टेजवर महिलेच्या डोक्यावर थुंकला, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 15:24 IST

Hairstylist Javed Habib spit on woman's head : लोकांना केस कसे सेट करायचे याच्या टिप्स देताना त्याने प्रथम बागपत येथील बडौत येथे राहणाऱ्या एका महिलेचे डोके पकडले आणि जोराने हलवले, नंतर धक्कादायक पद्धतीने धक्का दिला आणि नंतर तिच्या डोक्यावर थुंकून तिचे केस कापले.

बागपत - प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट जावेद हबीब यांनी मुझफ्फरनगर, उत्तर प्रदेश येथे एका सेमिनारमध्ये एका महिलेच्या डोक्यावर थुंकला. जावेदने हे कृत्य 3 जानेवारी रोजी मुझफ्फरनगरमध्ये आयोजित केलेल्या एका सेमिनारमध्ये केले होते, परंतु त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोकांनी खचाखच भरलेल्या हॉलमध्ये सर्वांसमोर स्टेजवर हे कृत्य त्याने केले. लोकांना केस कसे सेट करायचे याच्या टिप्स देताना त्याने प्रथम बागपत येथील बडौत येथे राहणाऱ्या एका महिलेचे डोके पकडले आणि जोराने हलवले, नंतर धक्कादायक पद्धतीने धक्का दिला आणि नंतर तिच्या डोक्यावर थुंकून तिचे केस कापले.

या घटनेने दुखावलेल्या महिलेने यूपी यूकेशी बोलताना सांगितले की, माझे नाव पूजा गुप्ता आहे आणि माझे वंशिका ब्युटी पार्लर नावाचे ब्युटी पार्लर आहे. मी  बडौत येथील रहिवासी आहे. काल मी जावेद हबीब यांच्या एका चर्चासत्रात गेले होते. त्याने मला केस कापण्यासाठी स्टेजवर बोलावले आणि त्याने माझ्याशी इतके गैरवर्तन केले की मी खूप दुखावले. जर कोणाकडे पाणी नसेल तर तुम्ही स्वतःच्या थुंकीने केस कापू शकता हे त्यांनी दाखवून दिले आहे. मला या घटनेचे इतके दु:ख झाले आहे की, मी असं ठरवलं रस्त्यावरच्या केशभूषाकाराकडून केस कापून घेईन पण जावेद हबीबकडून केस कापणार नाही.तिथे काय झालेकार्यशाळेदरम्यान जावेद हबीब यांनी महिलेच्या केसांवर थुंकताना इस थूक में दम है असं हबीबने सांगितले. त्याने महिलेचा अपमान केला आणि सांगितले की तिचे केस खराब आहेत, कारण तिने शॅम्पू केला नाही. यानंतर, महिलेच्या केसांना विंचरताना तो म्हणतो की, केसांमध्ये पाण्याची कमतरता असल्यास, थुंकीने काम करा. यानंतर त्याने महिलेच्या केसांवर थुंकले. त्यावेळी संकोचामुळे महिलेला प्रतिक्रिया देता आली नाही. याबाबत जावेद हबीबी यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र वृत्त प्रसिद्ध होईपर्यंत त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती.

टॅग्स :Hair Care Tipsकेसांची काळजीUttar Pradeshउत्तर प्रदेश