मायावतींसाठी बालमजूरांनी तयार केले हॅलीपॅड
By Admin | Updated: June 1, 2014 12:17 IST2014-06-01T12:17:35+5:302014-06-01T12:17:35+5:30
उत्तरप्रदेशमधील बलात्कार पिडीत गावात भेटीसाठी जाणा-या बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांच्या बदायू भेटीत नवीनच वाद निर्माण झाला आहे.

मायावतींसाठी बालमजूरांनी तयार केले हॅलीपॅड
ऑनलाइन टीम
बदायू, दि. १ - उत्तरप्रदेशमधील बलात्कार पिडीत गावात भेटीसाठी जाणा-या बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांच्या बदायू भेटीत नवीनच वाद निर्माण झाला आहे. बदायूत मायावतींचे हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी तयार केलेल्या हॅलीपॅडच्या बांधणीत बालमजूरांना काम करायला लावल्याचे समोर आले आहे.
बदायूत दोघा बहिणींवर सामूहिक बलात्कार करुन त्यांची निर्घूणपणे हत्या करण्यात आली होती. या बलात्कार पिडीत मुलींच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी बसप प्रमुख मायावती रविवारी दुपारी बदायूत येणार आहेत. मायावती बदायूत हेलिकॉप्टरने येणार असून यासाठी बदायूच्या मोकळ्या भूखंडावर तात्पूरत्या स्वरुपात हॅलीपॅड तयार करण्यात आले आहे. हे हॅलीपॅड तयार करण्यासाठी लहान मुलांना कामाला लावल्याचे कॅमे-यात कैद झाले आहे. या संतप्तप्रकाराने बसपवर टीकेची झोड उठली आहे. बसप नेत्यांनी मात्र या वृत्ताचा इन्कार केला आहे.गावातील काही लहान मुल मातीत खेळत असल्याचा संतप्त खुलासा बसप नेत्यांनी केला आहे. आता मायावती याविषयी बसप नेत्यांची कानउघडणी करतील की याकडे दुर्लक्ष करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.