शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
4
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
5
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
6
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
7
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
8
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
9
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
10
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
11
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
12
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
13
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
14
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
15
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
16
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
17
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
19
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
20
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 

व्हाईस रेकॉर्डिंगपासून पळतोय हनीसिंग

By admin | Updated: February 16, 2015 23:55 IST

हायकोर्ट : राज्य शासनाचे प्रतिज्ञापत्र सादर

हायकोर्ट : राज्य शासनाचे प्रतिज्ञापत्र सादर
नागपूर : अश्लील गाणी गाण्याचा आरोप असलेले पंजाबी रॅप गायक हिरदेशसिंग सरबजितसिंग ऊर्फ यो यो हनीसिंग व आदित्य पी.पी. सिंग ऊर्फ बादशाह हे व्हाईस रेकॉर्डिंगपासून पळत असल्याचा आरोप राज्य शासनाने केला आहे.
यासंदर्भात शासनाने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर केले. हनीसिंग व बादशाहच्या नावाने इंटरनेटवर उपलब्ध असलेली अश्लील गाणी त्यांनी स्वत:च गायली आहेत की नाही, हे तपासण्यासाठी पोलिसांना दोघांचेही व्हाईस रेकॉर्डिंग करायचे आहे. यासाठी दोघांनाही पाचपावली पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले आहे. व्हाईस रेकॉर्डिंग न्यायसहायक प्रयोगशाळेत पाठवून प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याचा पोलिसांचा विचार आहे. परंतु दोघेही सहकार्य करीत नसल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय दोघांचे भारतातील पत्तेही बनावट असल्याचे सांगण्यात आले आहे.
व्यावसायिक आनंदपालसिंग जब्बल यांच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी २६ एप्रिल २०१४ रोजी हनीसिंग व बादशाहविरुद्ध भादंविच्या कलम २९२, २९३ व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७, ६७-अ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी दोघांनीही सत्र न्यायालयात अर्ज दाखल केले आहेत. २९ जानेवारी रोजी सत्र न्यायालयाने दोघांनाही अर्जांवरील प्रत्येक सुनावणीला व्यक्तिश: उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. याविरुद्ध त्यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केले आहेत. सत्र न्यायालयाचा आदेश रद्द करण्याची त्यांची विनंती आहे. सत्र न्यायालयाच्या आदेशावर उच्च न्यायालयाची तात्पुरती स्थगिती आहे. हनीसिंगतर्फे ॲड. अतुल पांडे, तर शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील मुकुंद एकरे यांनी बाजू मांडली.