शहरात चोरट्यांचा हैदोस
By Admin | Updated: February 16, 2015 21:12 IST2015-02-16T21:12:10+5:302015-02-16T21:12:10+5:30
वाडी, अंबाझरी, कळमन्यात घरफोडी : रोख आणि दागिने लंपास

शहरात चोरट्यांचा हैदोस
व डी, अंबाझरी, कळमन्यात घरफोडी : रोख आणि दागिने लंपासनागपूर : शहरातील विविध भागात चोरट्यांनी हैदोस घातला असून वाडी, अंबाझरी आणि कळमन्यात घरफोडी करून लाखोंचा ऐवज लंपास केला. डिफेन्स वसाहतीत राहाणारे दीपक महादेव डोंगरे (वय ४४) हे १२ फेब्रुवारीला सहपरिवार बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी त्यांच्या दाराचा कुलूप कोंडा तोडून सोन्या-चांदीचे दागिने तसेच ५०० रुपये असा एकूण १ लाख, २२ हजारांचा ऐवज चोरून नेला. रविवारी रात्री ७.३० वाजता ही घटना उघडकीस आली. डोंगरे यांच्या तक्रारीवरून वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अंबाझरीतील भंबानी टेक्सटाईल्सचे शटर वाकवून चोरट्यांनी रोख १७ हजार तसेच ३० साड्या आणि महत्त्वाची कागदपत्रे असा एकूण ७६ हजारांचा ऐवज लंपास केला. १४ तारखेच्या मध्यरात्री ही घटना घडली. प्रदीप गोविंदराव भंबानी यांच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदविला.अशाच प्रकारे कळमन्यातील भवानी नगरात राहणारे यादवकुमार शिवलाल शाहू (वय ३५) यांच्याकडे रविवारी दिवसाढवळ्या घरफोडीची घटना घडली. सकाळी ८.३० वाजता ते सक्करदरा येथे गेले. ४ वाजता परत आले तेव्हा घरातून चोरट्यांनी ७२ हजारांचे दागिने चोरून नेल्याचे उघड झाले. शाहू यांच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. ----