शहरं
Join us  
Trending Stories
1
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
2
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
3
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
4
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
5
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
6
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
7
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
8
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
9
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
10
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
11
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
12
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
13
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
14
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
15
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
16
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
17
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
18
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
19
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
20
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले

'ऑपरेशन सिंदूर'मुळे हाफिज सईदच्या मुलाला भरली धडकी! म्हणतोय "मला सोडा,मी काहीच केलं नाहीये..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 15:46 IST

पाकिस्तानमधील दहशतवादाच्या मुळांवर 'ऑपरेशन सिंदूर'चा जोरदार आघात बसल्यामुळे तिकडच्या दहशतवादी गटांमध्ये जबरदस्त भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

भारताने अलीकडेच राबवलेलं ऑपरेशन ‘सिंदूर’ पाकिस्तानसाठी एक मोठा हादरा ठरलं आहे. पाकिस्तानमधीलदहशतवादाच्या मुळांवर हा जोरदार आघात बसल्यामुळे तिकडच्या दहशतवादी गटांमध्ये जबरदस्त भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या कारवाईनंतर पाकिस्तानमधून कुठलाही औपचारिक प्रतिसाद न मिळाल्याने त्यांच्या मौनातूनच परिस्थितीचं गांभीर्य स्पष्ट होतं.

तल्हा सईद घाबरलादहशतवादी हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईद सध्या पाकिस्तानी सोशल मीडियावर एका व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये तो म्हणाला की, “भारताला हाफिज सईदची गरज का आहे?” मात्र, त्याचा संताप आणि बचावात्मक भूमिका पाहता हे स्पष्ट होतं की, ऑपरेशन सिंदूरमुळे त्याच्या मनात भीती घर करून बसली आहे.

कालपर्यंत भारतविरोधी जहरी वक्तव्य करणारे हे चेहरे आज स्वतःच्या निष्पापतेचा दाखला देताना दिसत आहेत. यावरून स्पष्ट होते की ऑपरेशन सिंदूरनंतर त्यांचा आत्मविश्वास डळमळीत झाला आहे.

७ मेच्या कारवाईने दहशतवादी तळ हादरले!७ मे रोजी भारताने पाकिस्तानातील विविध दहशतवादी तळांवर तडाखेबंद कारवाई केली. या कारवाईत हाफिज सईद आणि मसूद अझहरच्या दहशतवादी नेटवर्कवरही आघात करण्यात आला. हाफिजच्या ठिकाणावर झालेला हल्ला अत्यंत प्रभावी होता, आणि मसूद अझहरचा बहावलपूर येथील मदरसा उद्ध्वस्त झाला. दोघेही या कारवाईतून थोडक्यात वाचले, मात्र त्यांची सुरक्षितता आता धोक्यात आहे.

दहशतवादी नेत्यांच्या काळजावर भीतीची छाया!हाफिज सईद आणि मसूद अझहरसारखे कुख्यात दहशतवादी आता त्यांच्या गुप्त ठिकाणांवर लपून बसले आहेत. ऑपरेशन सिंदूरमुळे त्यांना समजलं आहे की, भारत आता केवळ प्रतिक्रियाशील भूमिका न घेता थेट कारवाई करतोय. त्यामुळेच पाकिस्तानातील इतर दहशतवादी गटांमध्ये देखील असुरक्षिततेची भावना आहे.

राजकीय नेतृत्वालाही झटकाफक्त दहशतवादीच नव्हे, तर पाकिस्तानातील उच्चपदस्थ नेते – शाहबाज शरीफ आणि जनरल मुनीर – यांच्याही हालचालींवर याचा परिणाम झालेला दिसतो. आताच्या घडीला त्यांच्यावरही दबाव वाढलेला आहे, कारण देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची प्रतिमा खराब झाली आहे.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवादPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक