'हाफिज सईदलाही पाकिस्तानात घुसून मारा', शहीदाच्या पत्नीचा आक्रोश

By Admin | Updated: September 30, 2016 16:26 IST2016-09-30T16:09:53+5:302016-09-30T16:26:19+5:30

भारतीय लष्कराने पाकिस्तानात घुसून लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदला ठार केले पाहिजे, असा आक्रोश उरी हल्ल्यात शहीद झालेले जवान हवालदार अशोक कुमार यांच्या पत्नी संगीतादेवी यांनी व्यक्त केला आहे.

'Hafiz Saeedlah enters Pakistan', Shahid's wife's resentment | 'हाफिज सईदलाही पाकिस्तानात घुसून मारा', शहीदाच्या पत्नीचा आक्रोश

'हाफिज सईदलाही पाकिस्तानात घुसून मारा', शहीदाच्या पत्नीचा आक्रोश

ऑनलाइन लोकमत

बिहार, दि. 30 - भारतीय लष्कराने पाकिस्तानात घुसून लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदला ठार केले पाहिजे, असा आक्रोश उरी हल्ल्यात शहीद झालेले जवान हवालदार अशोककुमार सिंह यांच्या पत्नी संगीतादेवी यांनी व्यक्त केला आहे. ज्याप्रमाणे अमेरिकेने 9/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड ओसामा बिन लादेनला पाकिस्तानात घुसून ठार मारले होते, त्याचप्रमाणे भारतीय सैन्यानंही पाकिस्तानात घुसून हाफिज सईदचा खात्मा करायला हवा, असे संगीतादेवी यांनी म्हटले आहे.   
 
भारतीय लष्कराने पाकव्याप काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तानी सैनिक आणि दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले केले. सैनिकांनी उरी हल्ल्याला दिलेल्या या प्रत्युत्तरावर मी खूप संतुष्ट आहे, असे सांगत संगीतादेवी यांनी आनंद व्यक्त केला. देश सेवेसाठी मी आणि माझे कुटुंबीय कोणतंही त्याग करायला तयार आहोत, असंही त्यांनी म्हटले आहे. सोबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील आभार मानले. संगीतादेवी यांचा मुलगा आणि पुतण्यादेखील भारतीय लष्करात कार्यरत आहेत. 
आणखी बातम्या 
दरम्यान, नरेंद्र मोदी सरकारनं पाकिस्तानातील दहशतवादी आणि त्यांचे तळ उद्धवस्त करताना मागे-पुढे पाहू नये. त्यामुळे
माझ्यावर आज जी वेळ आली आहे ती कुठल्याच भारतीय सैनिकांच्या पत्नीवर येणार नाही, अशी भावनादेखील संगीतादेवी यांनी व्यक्त केली. 
 

Web Title: 'Hafiz Saeedlah enters Pakistan', Shahid's wife's resentment