हाफीज सईदचं ते ट्विटर अकाउंट बनावट, राजनाथ सिंहांची गफलत
By Admin | Updated: February 15, 2016 15:59 IST2016-02-15T15:59:11+5:302016-02-15T15:59:11+5:30
हाफीज सईदचा जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील त्या विद्यार्थ्यांना पाठिंबा असल्याचा दावा केला होता, ते ट्विटर खातं बनावट असल्याचं समोर आलं आहे.

हाफीज सईदचं ते ट्विटर अकाउंट बनावट, राजनाथ सिंहांची गफलत
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - हाफीज सईदच्या ज्या ट्विटर अकाउंटचा संदर्भ देत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी हाफीज सईदचा जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील त्या विद्यार्थ्यांना पाठिंबा असल्याचा दावा केला होता, ते ट्विटर खातं बनावट असल्याचं समोर आलं आहे.
इंडियन एक्स्प्रेसने गुप्तचर खात्याच्या व पोलीसांमधील सूत्रांच्या हवाल्याने ते ट्विटर खाते हाफीज सईद अथवा त्याच्या नजीकच्या व्यक्तिचे नसल्याचे म्हटले आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील आंदोलक विद्यार्थ्यांना पाकिस्तान भेटीचे निमंत्रण या खात्यावरून देण्यात आले होते, तसेच भारतविरोधी आणि काश्मिरचा मुद्दा उचलण्याबद्दल कौतुक करण्यात आले होते.
मात्र, हे खातेच हाफीज सईदचे नसल्यामुळे बनावट खात्यावरील पोस्टआधारे केंद्रीय गृहमंत्र्यांनी आधारहीन विधान केल्याची टीका होत आहे.