हाफीज सईद, लख्वीच्या जागी सलमान, महेश भट्ट मोस्ट वाँटेडच्या यादीत - सलीम खान

By Admin | Updated: October 4, 2016 12:14 IST2016-10-04T12:05:08+5:302016-10-04T12:14:23+5:30

हाफीज सईद, लख्वी आणि मसूद अझर या दहशतवाद्यांची जागा सलमान खान, महेश भट्ट, करण जोहर आणि सीताराम येचुरी यांनी घेतली आहे.

Hafeez Saeed, Salman Khan in place of Lakhvi, Mahesh Bhatt on the list of most wanted - Salim Khan | हाफीज सईद, लख्वीच्या जागी सलमान, महेश भट्ट मोस्ट वाँटेडच्या यादीत - सलीम खान

हाफीज सईद, लख्वीच्या जागी सलमान, महेश भट्ट मोस्ट वाँटेडच्या यादीत - सलीम खान

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ४ - टाइम्स नाऊच्या मोस्ट वाँटेड लिस्टमध्ये हाफीज सईद, लख्वी आणि मसूद अझर या दहशतवाद्यांची जागा सलमान खान, महेश भट्ट, करण जोहर आणि सीताराम येचुरी यांनी घेतली आहे. सलमान खान, महेश भट्ट, करण जोहर आणि सीताराम येचुरी यांच्यापासून देशाच्या एकात्मतेला धोका आहे असे उपरोधिक टि्वट सलीम खान यांनी केले आहे. 
 
पाकिस्तानी कलाकारांचे समर्थन केल्यामुळे या चौघांवर माध्यमांमधून जोरदार टीका सुरु आहे. पाकिस्तानी कलाकार म्हणजे काही दहशतवादी नाहीत, त्यामुळे त्यांना भारतात काम करण्यास बंदी घालणं योग्य नाही' असे सलमानने म्हटले होते. त्यामुळे माध्यमांमधून त्यांच्यावर जोरदार टीका सुरु आहे. 
 
सलीम खान यांनी टि्वटरवरुन टाइम्स नाऊच्या अर्णब गोस्वामीवर निशाणा साधला आहे. येचुरी जरा संभाळून, शांततेबद्दल बोलाल तर तुम्हाला गद्दार ठरवले जाईल असे सलीम खान यांनी म्हटले आहे. 
 
आणखी वाचा 
 

Web Title: Hafeez Saeed, Salman Khan in place of Lakhvi, Mahesh Bhatt on the list of most wanted - Salim Khan