शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

हादियाला पतीसोबत राहण्याचा संपूर्ण अधिकार- सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2018 17:46 IST

राष्ट्रीय तपासयंत्रणा या प्रकरणातून बाहेर आलेल्या गोष्टींची चौकशी सुरू ठेवू शकते, असेही कोर्टाने यावेळी स्पष्ट केले.

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवून लग्नानंतर मुस्लिम धर्म स्वीकारणाऱ्या हादियाला तिच्या पतीसोबत राहण्याचा पूर्ण अधिकारी असल्याचा निर्णय दिला. हादियाला तिच्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने वाटचाल करण्याचा कायदेशीर हक्क आहे, असेही यावेळी न्यायालयाने सांगितले. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्त्वाखालील खंडपीठाने हा निर्णय दिला. यामुळे हादियाला मोठा दिलासा मिळाला आहे. ती आता आपला पती शफीसोबत राहू शकणार आहे. परंतु, राष्ट्रीय तपासयंत्रणा या प्रकरणातून बाहेर आलेल्या गोष्टींची चौकशी सुरू ठेवू शकते, असेही कोर्टाने यावेळी स्पष्ट केले. मात्र, या निकालानंतर हादियाचे वडील अशोकन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. माझ्या मुलीला एका दहशतवाद्याबरोबर जाऊन दिले, याचे मला दु:ख वाटते, असे अशोकन यांनी म्हटले. मात्र, मी माझा कायदेशीर लढा सुरुच ठेवेन. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून या प्रकरणाची चौकशी सुरूच आहे. कारण, शफी जहाँ हा दहशतवादी असल्याचा त्यांना दाट संशय आहे, असे अशोकन यांनी सांगितले.  

गेल्यावर्षी हादियाने मुस्लिम धर्म स्वीकारत शफी जहाँ नावाच्या इसमासोबत लग्न केले होते. यानंतर तिचे वडील अशोकन के.एम. यांनी तिच्या या लग्नाविरोधात न्यायालयात दाद मागितली होती. केरळ हायकोर्टाने या प्रकरणाला 'लव्ह जिहाद' मानत हे लग्न अवैध ठरवले होते. हादियाचे पती शफी यांनी या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. गेल्या सुनावणीतही सर्वोच्च न्यायालयाने हादियाच्या बाजूने निकाल दिला होता. हादिया सध्या तामिळनाडूत शिक्षण घेत आहे. कथित लव्ह जिहादचा बळी ठरलेल्या हादियाला तामिळनाडूत वैद्यकीय शिक्षणासाठी परत पाठविण्याच्या निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. मात्र, आपल्याला आपला पती शफीला भेटण्याचं स्वातंत्र्य नसल्याचं हादियाने सांगितले होते. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयLove Jihadलव्ह जिहाद