एच.एस.ब्रम्हा होणार मुख्य निवडणूक आयुक्त
By Admin | Updated: January 14, 2015 18:04 IST2015-01-14T18:04:35+5:302015-01-14T18:04:35+5:30
देशाचे पुढील मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून एच.एस. ब्रम्हा यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे.

एच.एस.ब्रम्हा होणार मुख्य निवडणूक आयुक्त
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १४ - देशाचे पुढील मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून एच.एस. ब्रम्हा यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत हे उद्या १५ जानेवारी २०१५ रोजी सेवेतून निवृत्त होत असल्याने त्यांच्या जागी ब्रम्हा यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. आंध्र प्रदेशातील १९७५ च्या केडर बॅचचे आयएएस अधिकारी असलेल्या ब्रम्हा यांनी याआधी आसाममध्ये २०१० साली निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. ब्रम्हा हे सेवानिवृत्त अधिकारी असून ते केंद्रीय उर्जा मंत्रालयातील सचिव पदावर असताना निवृत्त झाले आहेत.