शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
5
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
6
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
7
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
8
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
9
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
11
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
12
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
13
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
14
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
15
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
16
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
17
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
18
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
19
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
20
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत

एच-१बी व्हिसामुळे या कंपन्यांना बसणार फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 00:13 IST

‘अमेरिकी नागरिकत्व व आव्रजन सेवे’ने एच-१बी व्हिसाच्या नियमनाचा आढावा घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

नवी दिल्ली : अमेरिके चे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने सत्तेत आल्यापासून एच-१बी व्हिसावर अमेरिकेत येणाऱ्या कामगारांच्या संख्येवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यातच आता कोरोनाचे संकट उद्भवल्यानंतर अमेरिकेतील आव्रजन (इमिग्रेशन) पूर्णत: बंद करण्यात आले आहे. एच-१बी व्हिसाधारकांवरही बंदी घालण्याचा विचार ट्रम्प प्रशासनाने चालविला आहे. असे झाल्यास अमेरिकेतील १० मोठ्या कंपन्यांना जबर फटका बसणार आहे.

उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, ‘अमेरिकी नागरिकत्व व आव्रजन सेवे’ने एच-१बी व्हिसाच्या नियमनाचा आढावा घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. विदेशी कामगारांच्या हंगामी कार्य अधिकारावर त्याचा थेट परिणाम होईल. अमेरिकेतील १० बड्या कंपन्यांवर एच-१बी व्हिसा बंदीचा किती परिणाम होईल याचा हा लेखाजोखा.

अ‍ॅमेझॉनअ‍ॅमेझॉनमध्ये ७,५०,००० कर्मचारी काम करतात. त्यातील ३,५७५ कर्मचारी एच-१बी व्हिसाधारक आहेत.

अल्फाबेट (गुगल)अल्फाबेट अथवा गुगलकडे १,१८,८९९ कर्मचारी आहेत. त्यातील २,७०७ कर्मचारी एच-१बी व्हिसाधारक आहेत.

मायक्रोसॉफ्टकंपनीकडे १४,४०० कर्मचारी आहेत. एच-१बी व्हिसा मंजुरी १,७०६ जणांची आहे.

फेसबुकलोकप्रिय सोशल नेटवर्किंग साइटकडे ४४,९४२ कर्मचारी असून १,५३४ जणांची एच-१बी व्हिसा अर्ज परवानगी आहे.

आयबीएम२०१८ मधील आकडेवारीनुसार आयबीएमकडे ३,८१,१०० कर्मचारी असून, एच-१बी व्हिसाच्या मंजूर अर्जांची संख्या १,२५६ आहे.

अ‍ॅपलया आघाडीच्या स्मार्टफोन उत्पादक कंपनीकडे १,३७,००० कर्मचारी असून, मंजूर एच-१बी अर्जांची संख्या १,१५५ आहे.

इंटेल१,१०,८०० कर्मचारी असलेल्या इंटेलच्या एच-१बी व्हिसाच्या मंजूर अर्जांची संख्या १,०१४ आहे.

सिस्कोसिस्कोमधील कामगार संख्या ७५,९०० असून, मंजूर एच-१बी अर्जांची संख्या ६९० आहे.

क्वालकॉमया चिपसेट उत्पादक कंपनीची श्रमशक्ती ३७ हजार असून, मंजूर एच-१बी याचिकांची संख्या ६५२ आहे.

उबेरअमेरिकास्थित बहुराष्ट्रीय राईड-हेलिंग कंपनी उबेरची कर्मचारी संख्या २,६०,९०० असून, मंजूर एच-१बी व्हिसा याचिकांची संख्या ४९१ आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाIndiaभारत