शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानवापीचे सर्वेक्षण होणार; अलाहाबाद उच्च न्यायालयाची परवानगी, आजपासून अंमलबजावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 06:28 IST

शुक्रवारपासून सर्वेक्षण सुरू होणार असल्याचे जिल्हाधिकारी एस. राजलिंगम यांनी सांगितले.

प्रयागराज : अलाहाबाद उच्च न्यायालयाने गुरुवारी ज्ञानवापी मशीद संकुलाच्या सर्वेक्षणाविरोधात अंजुमन इंतेजामिया मशीद समितीने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. त्यामुळे पुरातत्त्व सर्वेक्षणाचा मार्ग मोकळा झाला. शुक्रवारपासून सर्वेक्षण सुरू होणार असल्याचे जिल्हाधिकारी एस. राजलिंगम यांनी सांगितले.

समितीने वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या २१ जुलैच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने सर्वेक्षणाचे आदेश देताना सांगितले की, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने (एएसआय) संरचनेला नुकसान होणार नाही, असे आश्वासन दिले आहे आणि त्यावर अविश्वास दाखवण्याचे कोणतेही कारण नाही, परंतु सर्वेक्षणासाठी कोणतेही उत्खनन केले जाऊ नये.

उत्खनन नाही : एएसआय२७ जुलै रोजी एएसआयचे अतिरिक्त संचालक आलोक त्रिपाठी यांनी न्यायालयाला सांगितले होते की, एएसआय उत्खनन करणार नाही. त्यावर मुस्लीम बाजूचे वकील एसएफए नक्वी यांनी आक्षेप घेतला.  त्यानंतर, त्रिपाठी यांनी स्पष्ट केले की, पथक पहिल्यांदाच मशिदीच्या ठिकाणी गेले असल्याने, त्यांनी काही उपकरणे सोबत घेतली होती, परंतु ती खोदण्यासाठी नाही, तर तेथील मलबा साफ करण्यासाठी आहेत.

सुप्रीम काेर्टात आव्हान- ज्ञानवापी मशिदीचे पुरातत्त्वीय सर्वेक्षण करण्यास अलाहाबाद उच्च न्यायालयाने आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाला परवानगी दिली. - या निर्णयाविरोधात अंजुमन इंतेजामिया मशीद समितीने सर्वोच्च न्यायालयात घाव घेतली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर ही याचिका सादर करण्यात आली.

वजुखानाचे सर्वेक्षण नाही...मशिदीत कथित शिवलिंग असल्याचा दावा केला जात आहे. तो मशिदीचा वजुखाना सर्वेक्षणाचा भाग असणार नाही. कारण सर्वोच्च न्यायालयाने आधी ती जागा संरक्षित करण्याचे आदेश दिले होते.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशVaranasiवाराणसीHigh Courtउच्च न्यायालय